Tech News : OnePlus 9 Pro 5G हा स्मार्टफोन ऑफरमध्ये खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांची प्रतीक्षा संपली आहे. वेबसाइट (Oneplus.in) वरून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या या आकर्षक दिसणाऱ्या स्मार्टफोनला एक्सचेंज बोनसद्वारे 7000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाईल. याशिवाय HDFC क्रेडीट कार्ड वापरण्यावर ग्राहकांना तीन हजार रुपयांची सूट दिली जाईल. त्याचबरोबर सिलेक्टेड अमेरिकन एक्सप्रेस कार्डवर 10 टक्के कॅशबॅक देखील दिला जाईल.


OnePlus 9 Pro 5G हा लेटेस्ट स्मार्टफोन आहे, जो यावर्षी लाँच झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक लेटेस्ट फिचर्स आहेत. या फोनचे मुख्य आकर्षण म्हणजे मागील पॅनलवरील त्याचा कॅमेरा सेटअप, जो Hasselblad च्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. यात मागच्या पॅनलवर चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. तसेच, हा फोन स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटवर काम करतो.


OnePlus 9 Pro चे स्पेसिफिकेशन 


OnePlus 9 Pro मध्ये 6.7-इंच QHD + AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1440 × 3216 पिक्सेल आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित Oxygen OS 11 वर काम करतो. हा फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन कार्बन ब्लॅक आणि लेक ब्लू कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. डिस्प्ले LTPO टेक्नोलॉजीसह जोडलेले आहे, जे स्मार्ट 120Hz फीचर्सने सज्ज आहे. हा स्मार्टफोन 4500 mAh बॅटरीसह येतो. यात 65W वायर चार्जिंग सिस्टम आहे. याशिवाय 50W ची वायरलेस चार्जर प्रणाली देण्यात आली आहे.


किंमत किती आहे?


या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे. तुम्ही हा फोन 3,152 रुपयांच्या हप्त्याने खरेदी करू शकता. हे हप्ते 2 वर्षांसाठी असतील. अॅमेझॉनवर दिलेल्या माहितीनुसार, यूजर्सना यावर 10,639 रुपये व्याज द्यावे लागेल.