मुंबई : आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स देण्यात येणार आहे. अमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत बंपर सेल जाहीर करण्यात आला आहे.


अमेझॉनवर 23 ते 25 जून, मिंत्रावर 24 ते 26 जून, फ्लिपकार्टवर 24 ते 26 जून, स्नॅपडीलवर आज आणि उद्या हा सेल सुरु राहणार आहे. त्यामुळे शॉपिंग लव्हर्सकरता ही एक पर्वणीच ठरणार आहे.

दरम्यान, काही साईट्सवर अगदी 80 टक्क्यांपर्यंत सेल आहे, दुसरीकडं अमेझॉननं काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन सेल सुरु केला होता. यामध्ये मोटोरोला, वनप्लस,  अॅपल, सॅमसंग आणि इतर ब्रॅण्डेड स्मार्टफोनवर जबरदस्त सूट देण्यात आली होती.

19 ते 21 जूनपर्यंच्या या सेलमध्ये अमेझॉननं वन प्लस 3 टी 64 जीबी स्मार्टफोन 29,999 रुपयांना उपलब्ध करुन दिला होता. तर एक्स्चेंज ऑफरमध्ये हा स्मार्टफोन 13,060 रुपयांपर्यत सूट दिली होती.

तर आयफोन 7 च्या 32 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी स्मार्टफोन हे अनुक्रमे 42,999 रु. 54,990 रुपये आणि 65,900 रुपयांना उपलब्ध होते. याशिवाय 13,060 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफरही होती. या सेलमध्ये आयफोन 6 चा 32 जीबी स्मार्टफोन 24,999 रुपयात उपलब्ध करुन देण्यात आला होता.

दुसरीकडे 1 जुलैपासून देशात सर्वत्र जीएसटी लागू होणार असल्याने, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटो मोबाईल कंपन्यांनी आपल्या उत्पादनांवर भरघोस सूट देऊ केली आहे. जीएसटीमुळे ऑटो मोबाईल कंपन्यांनी आपल्या गाड्यांवर 15 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला आहे.

संबंधित बातम्या

अमेझॉनचा जबरदस्त सेल, अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट

जीएसटीपूर्वी ग्राहकांची दिवाळी, जवळपास सर्वच कंपन्यांकडून भरघोस सूट