वेगवेगळ्या ऑफर्ससोबत बीएसएनएलचा फोन बाजारात येईल, असे म्हटले जात आहे. शिवाय, 2 हजार 500 रुपयांहून कमी किंमतीचा हा स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे.
बीएसएनएलचे अधिकारी के. रामाचंद यांच्या माहितीनुसार, “स्वस्त दरात स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्यासाठी बीएसएनएलने मायक्रोमॅक्स आणि लाव्हा कंपनीसोबत भागिदारी केली आहे. मात्र या स्मार्टफोनची नक्की किंमत किती असेल, याबाबत सध्या विचार सुरु आहे.”
सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच सीओएआयच्या रिपोर्टनंतर बीएसएनएलने स्मार्टफोनबाबतची घोषणा केली. या रिपोर्टनुसार, 16 टक्क्यांपर्यंत इंटरनेट ग्रामीण भागात वापरला जातो. ग्रामीण भागात बीएसएनएलचे ग्राहक चांगल्या प्रमाणात असल्याने बीएसएनएलने स्मार्टफोनबाबतही विचार सुरु केला आहे.