नवी दिल्ली : बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी गुढीपाडव्यानिमित्त विशेष ऑफर दिली आहे. या नव्या ऑफरनुसार, जे बीएसएनएलचे ग्राहक इंटरनेटचा वापर करत नाहीत, त्यांना 1 जीबीचा इंटरनेट डेटा मोफत दिला जाणार आहे.


बीएसएनएलने याबाबतची माहिती देताना सांगितलंय की, डिजिटल इंडियाच्या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी, आम्ही आमच्या ग्राहकांना मोफत डेटा देत आहोत. या माध्यमातून प्रीपेड ग्राहकांकडून इंटरनेटचा वापर जास्तीतजास्त वाढू शकेल.

कंपनीनं पुढे सांगितलंय की, बीएसएनएल PAN (presence across nation)अंतर्गत स्मार्टफोन यूजर्ससाठी 1 जीबीचा मोफत इंटरनेट डेटा देणार आहे. जे ग्राहक जीएसएम डेटा सेवेचा लाभ घेत नाहीत, त्यांच्यासाठी ही ऑफर लाभदायक आहे. या माध्यमातून बीएसएनएलच्या इंटरनेट युजर्सची संख्या वाढवण्याचा उद्देश असल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

यापूर्वीही रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी इतर टेलिकॉम कंपन्यांसोबतच बीएसएनएलनेही नवीन प्लॅन लॉन्च केला होता. या प्लॅननुसार बीएसएनएल यूजर्सना रोज 2 जीबी 3G डेटा देणार आहे. एवढच नव्हे, तर बीएसएनएलचे यूजर्स बीएसएनएल टू बीएसएनएल अनलिमिटेड कॉलिंग करु शकतील. यासाठी बीएसएनएल युजर्सना महिन्याला 339 रुपये मोजावे लागणार असल्याची घोषणा केली होती.

संबंधित बातम्या

जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनलचा मेगाप्लॅन !