BSNL ची बंपर ऑफर, 1,099 रुपयांत अनलिमिटेड 3G इंटरनेट
एबीपी माझा वेब टीम | 24 Aug 2016 06:24 PM (IST)
नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने 1 हजार 99 रुपयांमध्ये नॅशनल 3G अनलिमिटेड मोबाईल डेटा प्लॅनची घोषणा केली आहे. याशिवाय, बीएसएनएलने आधीपासून असलेल्या काही प्लॅनचं लिमिटही जवळपास दुप्पट केलं आहे. बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्तव यांनी माहिती दिली की, चांगल्या नेटवर्कमुळे बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. बीएसएनएल ही पहिलीच अशी कंपनी आहे, जी 1099 रुपयांना अनलिमिटेड 3G डेटा प्लॅन देते. बीएसएनएलने आपल्या 549 रुपयांच्या 3G डेटा प्लॅनमध्ये डेटा वापराची मर्यादाही 5 जीबीवरुन 10 जीबी केली आहे. याशिवाय, अन्य प्लॅनमध्येही डेटा वापराची मर्यादा वाढवली आहे.