मुंबई : भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात जिओनं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता इतर कंपन्यांनीही जिओला टक्कर देण्यासाठी शड्डू ठोकला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी बीएसएनएलनं आपली 5जी सेवा लॉन्च करण्याची तयारी चालवली आहे. तसंच 4जी VoLte सेवाही लवकरच बीएसएनएलकडून दिली जाणार आहे.
बीएसएनएलचे संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी आपल्या आगामी योजनांची माहिती दिली. यात मागच्याच वर्षी बीएसएनएलनं सरकारकडे 700 मेगाहर्टझच्या स्पेक्ट्रमची मागणी केली होती. लवकरच 4G VoLte आणि 5जी साठी बीएसएनएलला स्पेक्ट्रम मिळण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे.
स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी बीएसएनएलला सर्वात जास्तीच्या बोलीच्या किंमतीची बरोबरी करावी लागेल. मात्र ऑक्शनमध्ये भाग घेण्याची बीएसएनएलला आवश्यकता नसेल.
दरम्यान सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल नेटवर्कच्या विस्तारासाठी येत्या दोन वर्षात 40 हजार बेस ट्रान्झिव्हर स्टेशन (बीटीएस) उभे करण्यासाठी 6 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे बीएसएनएल नेटवर्कचा विस्तार होण्यासाठी मदत होईल.
उपकरणं तयार करणाऱ्या कंपन्यांना टेंडर देण्याची प्रक्रिया बीएसएनएलने सुरु केली आहे. या विस्तार योजनेत नोकिया आणि झेडटीई या सर्वात जास्त बोली लावणाऱ्या कंपन्या ठरल्या आहेत, अशी माहिती बीएसएनएलच्या एका अधिकाऱ्याने दिली.
बीएसएनएलने गेल्या तीन वर्षात 40 हजार बीटीएस उभे केले आहेत आणि आता पुढच्या टप्प्यातला विस्तार सुरु आहे. येत्या दोन वर्षात 40 हजार बीटीएस उभे केले जातील. यासाठी 6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती बीएसएनएलचे अध्यक्ष आणि प्रकल्प संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली.
नव्या बीटीएसमुळे 2G, 3G आणि 4G या तिन्हीही सेवा दिल्या जातील. शिवाय ग्राहक 2G नेटवर्क अपग्रेडही करु शकतील. बीएसएनएलचे सध्या 1 लाख 30 हजार बीटीएस आहेत. विस्तार योजनेनंतर याची संख्या 1 लाख 70 हजार होईल.
जिओला बीएसएनएलची टक्कर, लवकरच 4G VoLte आणि 5जी सेवा लॉन्च करणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2017 03:42 PM (IST)
सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी बीएसएनएलनं आपली 5जी सेवा लॉन्च करण्याची तयारी चालवली आहे. तसंच 4जी VoLte सेवाही लवकरच बीएसएनएलकडून दिली जाणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -