फरहानने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "सुप्रभात, मी माझे फेसबुक अकाऊंट कायमस्वरुपी बंद करत आहे. पण सध्या फरहान अख्तर लाईव्ह पेजवर अजूनही मी सक्रिय आहे."
आमची चूक झाली, मार्क झुकरबर्गचा माफीनामा
सध्या फेसबुकवर अकाऊंटवरील डेटा चोरीचा आरोप होत आहे. ब्रिटीश कंपनी केम्ब्रिज अॅनालिटिकाने फेसबुकवरील पाच कोटी सदस्यांची माहिती चोरुन, त्याचा गैरवापर केल्याचं समोर आलं आहे.
वेळ आलीय, फेसबुक डिलीट करा : व्हॉट्सअॅप सहसंस्थापक
त्यानंतर जगभरात अनेक दिग्गजांनी आपले फेसबुक अकाऊंट डिलीट केलं आहे. व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनीही फेसबुक डिलीट करण्याची वेळ आली आहे, असं म्हटलं होतं.
त्यानंतर अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांनी त्यांच्या स्पेस एक्स आणि टेस्ला या कंपन्यांचे लाखो लाईक्स असलेले फेसबुक पेज डिलीट केलं होतं. त्यामुळे फेसबुक अकाऊंट डिलीट करण्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत.
संबंधित बातम्या
फेसबुकला झटका, टेस्ला, स्पेस एक्स पेज डिलीट!
तुमची खासगी माहिती फेसबुक कसं चोरतं आणि कुणाला देतं?
फेसबुक लीक : भारतातील कुठल्या पक्षाचे हात दगडाखाली?
'डेटा चोर काँग्रेस'... फेसबुकच्या डेटा लीकचे भारतात पडसाद
डेटा लीक प्रकरणानंतर फेसबुकवरुन लाखो युजर्स ‘लॉग आऊट’
फेसबुकला दणका, एका दिवसात 395 अब्ज रुपयांचं नुकसान