या कारमध्ये 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. जे 190 पीएस पॉवर आणि 400 एनएम टॉर्क देतं. यामध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. या कारचा टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे. 7.2 सेंकदात ही कार 100 किमी वेग पकडते. या कारचं मायलेज 22.69 किमी प्रतिलीटर असल्याचा कंपनीचा दावा आहे.
या कारचं केबिन स्पोर्टी बनवण्यात आलं आहे. यामध्ये ड्यूल टोन ब्लॅक आणि लाल रंगाचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. या कारमध्ये 9 स्पीकरसोबत म्युझिक सिस्टम देण्यात आली आहे.
बातमी सौजन्य : cardekho.com