नवी दिल्ली : ब्लॅकबेरीने भारतात DTEK50 आणि DTEK60 हे हायटेक फीचर्सचे अँड्रॉईड स्मार्टफोन लाँच केले आहेत. भारतात DTEK50 ची किंमत 21 हजार 990 रुपये आणि DTEK60 ची किंमत 46 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे.
ब्लॅकबेरीच्या या फोन्सची अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. अखेर आज ही उत्सुकता संपली आहे. या फोन्सचे फीचर्स पाहता अनेकांसाठी हा आयफोन आणि गूगल पिक्सेल फोनला पर्याय ठरू शकतो.
DTEK50 चे फीचर्स
या फोनला 5.2 इंच आकाराची एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. 617 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 3 GB रॅम, 16 GB इंटर्नल स्टोरेज, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 2610mAh क्षमतेची बॅटरी असे फीचर्स या फोनमध्ये देण्यात आले आहेत.
DTEK60 चे फीचर्स
5.5 इंच आकाराची एचडी स्क्रीन, 821 फ्लॅगशीप स्नॅपड्रॅगन, 4 GB रॅम, 32 GB इंटर्नल स्टोरेज, 21 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 3000mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे.