मुंबई : कॅनेडियन स्मार्टफोन मेकर कंपनी ब्लॅकबेरीने आपला तिसरा अँड्रॉईड स्मार्टफोन DTEK60 लॉन्च केला. विशेष म्हणजे अॅपल आयफोन 7 आणि गूगलच्या पिक्सेल डिव्हाईसपेक्षाही स्वस्त असा हा स्मार्टफोन आहे.
या स्मार्टफोनची किंमत 499 डॉलर म्हणजे सुमारे 33 हजार रुपये आहे. ब्लॅकबेरीचा हा शेवटचा स्मार्टफोन असल्याने यातील फीचर्सबाबत अनेकांना उत्सुकता होती.
'DTEK60' स्मार्टफोनचे फीचर्स :
- फिंगरप्रिंट सेन्सर
- स्क्रीन साईज 5.5
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर
- 4 जीबी रॅम
- 21 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 8 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा
- टाईप-सी यूएसबी पोर्ट
- मार्शमॅलो 6.0
2016-2017 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अपेक्षित नफा ब्लॅकबेरी कंपनीला स्मार्टफोनच्या माध्यमातून झालेला नाही. कंपनी सध्या तोट्याचा सामना करते आहे. त्यामुळे आपल्या ट्रेडिशनल स्मार्टफोनचं प्रॉडक्शन बंद करुन केवळ सॉफ्टवेअर बिझनेसवर फोकस करणार आहे.