मुंबई : इग्निशन कॉईलमधील बिघाडाच्या कारणामुळे रॉयल एनफिल्डने 2.36 लाख बाईक्स परत मागवल्या आहेत. या बाईक्समध्ये मीटियॉर 350, बुलेट 350 आणि क्लासिक 350 चा समावेश आहे. कंपनीच्या सांगण्यानुसार वापरात असणाऱ्या काही बाईक्सच्या एका पार्टमध्ये बिघाड घाल्यामुळे, मिसफायरिंग आणि परफॉर्मन्समध्ये काही त्रुटी आढळून येत आहेत. फार कमी बाईक्समध्ये ही तक्रार असू शकते. डिसेंबर 2020 ते 2021 पर्यंतच्या बाईक्समध्ये ही तक्रार असल्याचा अंदाज वर्तवत कंपनीकडून महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. 


डिफेक्टिव्ह पार्ट बदलला जाणार 
सदर बाईक्स परत मागवल्यानंतर गरज पडल्यास त्यामध्ये बिघाड असणाऱे पार्ट बदलण्यात येणार आहेत. कंपनीच्या मते, 2.36 लाखांहून अधिक बाईक्स परत मागवल्या असल्या तरीही यातील फार कमी बाईक्समध्येच ही तक्रार आढळू शकते. ज्या आयशर मोटर्सशी संलग्न आहेत. 


'वर्क फ्रॉम होम'मुळे गुगलला मोठ्या प्रमाणात फायदा, एका वर्षात 7400 कोटी रुपयांची बचत


भारत, थायलंड, इंडोनेशिया आणि फिलिपिंससोबत इतरही देशातील बाईक्स परत मागवल्या 
कंपनीच्या सांगण्यानुसार जानेवारी ते एप्रिल 2021 दरम्यान, उत्पादन आणि विक्री करण्यात आलेल्या बाईक्स आता पुन्हा मागवण्यात आल्या आहेत. याच काळातील बुलेटही कंपनीनं परत मागवल्या आहेत. भारत, थायलंड, इंडोनेशिया आणि फिलिपिंससोबत इतरही काही देशांतील बाईक्ससाठी हा निर्णय़ घेण्यात आला आहे. 


इंटरनल टेस्टिंगदरम्यान ही अडचण कळून आल्याचं वृत्त आहे. परंतु सावधगिरी बाळगतच इतक्या मोठ्या संख्येनं या बाईक्स परत मागवण्यात आल्या आहेत. ज्या ग्राहकांच्या बाईक्स परत मागवल्या जात आहेत, त्यांच्याशी कंपनीची सर्व्हिस टीम किंवा लोकल डीलर संपर्क साधणार आहेत.