BGMI iOS App : PUBG मोबाईलचा इंडियन वर्जन बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया (BGMI) गेमची Apple फोन यूजर्स आतुरतेनं वाट पाहत होते. आता ही प्रतिक्षा संपली असून Krafton नं या गेमचं iOS वर्जन ग्राहकांसाठी लॉन्च केलं आहे. Krafton नं Android स्मार्टफोन यूजर्ससाठी हा गेम 2 जुलै रोजी रिलीज केला होता. आता दीड महिन्याहून अधिक काळानंतर Apple फोन यूजर्ससाठीही लॉन्च करण्यात आला आहे. त्यासोबतच Krafton नं BGMI च्या iOS अॅपच्या मेंटेनंस शेड्यूलचीही घोषणा केली आहे. 


गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये PUBG गेमवर भारतात बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरच्या काही महिन्यांतच PUBG नं Battleground Mobile India या नावानं भारतात गेमचं इंडियन वर्जन लॉन्च केलं. पण  ios वापरकर्त्यांना मात्र हा गेम खेळण्याची उत्सुकता होतीच. iOS मध्ये हा गेम आपल्याला कधी खेळायला मिळेल? या प्रतिक्षेत प्रत्येक युजर होता.  काही दिवसांपूर्वी iOS मध्ये BGMI हे सॅाफ्टवेअर लवकरच लॉन्च केलं जाईल, असं या गेमच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून सांगण्यात आलं होतं. तेव्हापासूनच iOS वापरकर्ते या गेमची आतुरतेने वाट बघत होते. बऱ्याच प्रतिक्षेनंतर मात्र आता ही आतुरता संपलेली आहे.


Battleground Mobile India ios App Store वर लाँच


BGMI चे शोधक क्राफ्टननं 18 ॲागस्टला BGMI हे गेमिंग सॅाफ्टवेअर iOS वापरकर्त्यांसाठी लाँच केलं असून ते हे वर्जन सध्या ट्रेंडिंमगमध्ये आहे. 


Battleground Mobile India नं याबद्दलची माहिती आपल्या सोशल मिडीयावर शेअर केली आहे. इंस्टावर ॲाफिशिअल अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत 'तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण आता BGMI iOS लॉन्च केलं जाणार असल्याचं कॅप्शनमध्ये लिहीलं आहे. Apple play store वर आपल्याला हा गेम डाऊनलोड करता येईल. शिवाय या गेमची लिंक इंस्टावरील बायोमध्ये देण्यात आलेली आहे. ही BGMI ची लिंक iOS वापरकर्त्यांसाठी आहे. 



Apple ID किंवा Face ID च्या सहाय्यानं गेम करा डाऊनलोड 


Apple स्टोरवर आपल्याला हा गेम दिसेल. हा गेम डाउनलोड करण्यासाठी Get चा ॲाप्शन क्लिक करून डाऊनलोड करु शकता. यासाठी आपल्याला आपला Apple ID Password किंवा Face ID शेअर करून हा गेम डाउनलोड करता येईल. या गेमची स्पेस 1.9 GB इतकी आहे. तसेच केवळ iOS 11.0 च्या पुढील वर्जन वापरणाऱ्या युजर्ससाठी हा गेम तयार करण्यात आलेला आहे.


गूगल प्ले स्टोर वर BGMI च्या  वापरकर्त्यांची संख्या 5 कोटी पार


BGMI गेम त्यावेळी अॅन्ड्रॉईड सॅाफ्टवेअरसाठी लाँच करण्यात आला होता. त्यावेळी हा गेम डाउनलोड करणाऱ्यांची संख्या 3 कोटी इतकी होती. त्यानंतर दिवसेंदिवस या संख्येत भर पडत गेली. आता ही संख्या 5 कोटीच्या घरात पोहोचली आहे. iOS वापरकर्ते हा गेम आता सहज डाउनलोड करू शकतात. BGMI हा गेम सर्वप्रथम ॲन्ड्रॅाईड युजर्ससाठी लॉन्च करण्यात आला होता.