- तुमचा मोबाईल कुणाच्याही हातात देऊ नका
- मोबाईलची स्क्रीन नेहमी लॉक असावी
- शक्य झाल्यास व्हॉट्सअॅपला पासवर्ड ठेवा
- सेटिंगमधील व्हॉट्सअॅप वेब या ऑप्शनमध्ये जाऊन तुमचं अकाऊंट कुठे कनेक्ट तर झालेलं नाही ना, याची खात्री करा
- गुगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅप डाऊनलोड करताना केवळ अधिकृत अॅपच डाऊनलोड करा. कारण, गुगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअपचे काही बनावट व्हर्जनही आहेत
... तर तुमचं व्हॉट्सअॅप कुणीही हॅक करु शकतं!
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 23 Feb 2018 10:50 AM (IST)
गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या एका अॅपच्या माध्यमातून हा प्रकार घडल्याचं औरंगाबादमध्ये समोर आलं आहे.
NEXT PREV
औरंगाबाद : तुम्हीही व्हॉट्सअॅप युझर असाल तर ही बातमी चिंतेत टाकणारी आहे. कारण, तुमचा मोबाईल दहा सेकंद जरी कुणाच्या हातात गेला तरी तुमचं व्हॉट्सअॅप अकाऊंट सहज हॅक करता येऊ शकतं. गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या एका अॅपच्या माध्यमातून हा प्रकार घडल्याचं औरंगाबादमध्ये समोर आलं आहे. औरंगाबादमधील प्रमोद राठोड यांनी याची तक्रार औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडे केली आहे. औरंगाबाद पोलिसांनीही हे प्रकरण गंभीर्याने घेतलं आहे. नागरिकांनी फोन कुणाच्याही हातात देऊ नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. शिवाय याबाबत गुगलकडे तक्रार करणार असल्याची माहितीही औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली. व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक कसं केलं जातं? गुगल प्ले स्टोअरवर एक असं अॅप उपलब्ध आहे, ज्यामुळे काही सेकंदात तुमचं व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक केलं जातं. या अॅपमध्ये एक क्यूआरकोड आहे, जो तुमच्या व्हॉट्सअॅप वेबने स्कॅन केला जातो. हा कोड स्कॅन करताच तुमच्या व्हॉट्सअॅपचा संपूर्ण डेटा हॅकरच्या मोबाईलमध्ये दिसेल. शिवाय तुमच्या अकाऊंटमधून कुणालाही मेसेज करता येऊ शकतो आणि तुमचे मेसेजही वाचले जाऊ शकतात. काय काळजी घ्यावी?