मुंबई : नोटांच्या तुटवड्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात एटीएम बंदच आहेत. पण आता रॅनसमवेअर व्हायरसच्या भीतीमुळे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना एटीएमच्या सुरेक्षासाठी सिस्टम अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने कालच रिझर्व्ह बँकेला यासंबंधीत आदेश दिले होते.

एटीएम सिस्टम अपडेट करण्यासाठी दिवसातील दोन ते तीन तास एटीएम बंद राहू शकतात. दरम्यान एटीएम तीन ते चार दिवस बंद राहणार, अशीही चर्चा सध्या सुरु आहे. मात्र एटीएम बंद राहणार नाहीत, तर अपडेशनसाठी दिवसातील काही तास एटीएम सेवा बंद असेल.

भारतातील 70 टक्के एटीएमवर सायबर हल्ला शक्य!

भारताचा अशा 99 देशांमध्ये समावेश आहे, ज्या देशांवर नुकताच सायबर हल्ला झाला आहे. आंध्र प्रदेश पोलिसांचे 102 कम्प्युटर शनिवारी हॅक करण्यात आले. यामध्ये गंभीर बाब म्हणजे भारतातील 70 टक्के एटीएमवर हा सायबर हल्ला करणं शक्य आहे.

कारण भारतातील 70 टक्के एटीएम अशा आऊटडेटेड सॉफ्टवेअरचा वापर करतात, ज्यांना सहजपणे हॅक केलं जाऊ शकतं. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, शेअर बाजार आणि पेमेंट कंपन्यांना अलर्ट जारी केला आहे.

भारतातील 70 टक्के एटीएममध्ये आऊटडेटेड विंडोज XP चा वापर केला जातो. याचं संपूर्ण नियंत्रण बँकांना सिस्टम पुरवणाऱ्या कंपनीच्या हातात आहे. मायक्रोसॉफ्टने अगोदरच विंडोज XP ला सपोर्ट करणं बंद केलं आहे. 2014 पासूनच मायक्रोसॉफ्ट विंडोज XP ला सिक्युरीटी आणि इतर टूल्सही देत नाही. दरम्यान इतर देशातील सायबर हल्ल्यानंतर मायक्रोसॉफ्टने विंडोजसाठी अपडेट रिलीज केली आहे.

... म्हणून रॅनसमवेयर व्हायरसचा हल्ला

इंग्लंडच्या अनेक रुग्णालयांचं म्हणणं आहे की, त्यांचे कम्प्युटर सुरु करण्यासाठी त्यांना खूप अडचणी येत आहेत. जे कम्प्युटर हॅक झाले आहेत. त्यांच्यावर एक मेसेज दाखवण्यात येत आहे. त्यात असं म्हटलं आहे की, फाइल रिकव्हर करायची असल्यास पैसे भरा.

या सायबर हल्ल्यासाठी रेनसमवेयर नावाच्या व्हायरसचा वापर केला असल्याचं म्हटलं जात आहे. रेनसमवेयर हा एक असा व्हायरस आहे की जो तुमच्या कम्प्युटर्स फाइल डिलीट करण्याची धमकी देतो. त्यासोबत अशीही धमकी दिली जाते की, जर तुमच्या फाइल वाचवायच्या असतील तर त्यासाठी पैसे द्या.

हा व्हायरस कम्प्युटरमधील असणाऱ्या फाइल आणि व्हिडिओ इनक्रिप्ट करतो आणि पैसे दिल्यानंतर पुन्हा तुमच्या फाइल सुरु होतात. सुदैवाने हा व्हायरस अद्याप भारतात पसरलेला नाही. पण याचा धोका कायम आहे.

कम्प्युटर व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काय करावं?


तुमच्या सिस्टममध्ये एखाद्या चांगल्या कंपनीचा अॅण्टी व्हायरस टाकून घ्या. तसेच अॅण्टी व्हायरसची शेवटची तारीख लक्षात ठेऊन ते वेळच्या वेळी अपडेट करा. तसेच तुम्ही तुमच्या कम्प्युटरला जेव्हा कधी मोबाइल, पेन ड्राईव्ह किंवा दुसरे कोणते डिव्हाईस जोडाल तेव्हा ते स्कॅन करुन घ्या. कोणत्या ऑनलाईन साइटवरुन काही डाऊनलोड करण्याआधी पहिले हे पाहा की ती वेबसाइट नोंदणीकृत आहे का. तसेच तुमची सिस्टम वेळच्या वेळी फॉर्मेट करत जा.

काय आहे रॅनसमवेयर व्हायरस?

अनेक देशात रेनसमवेयर नावाच्या कम्प्युटर व्हायरसला सायबर हल्ल्यासाठी जबाबदर  मानलं जातं. यूजर्सकडून पैसे उकळण्यासाठी या व्हायरसचा वापर केला जातो.

संबंधित बातम्या :

भारतातील 70 टक्के एटीएमवर सायबर हल्ला शक्य, RBI ला अलर्ट जारी


अनेक देशात सायबर हल्ला, रेनसमवेयर व्हायरसमुळे कम्प्युटर ठप्प