मुंबई : असुसने गुरुवारी 'झेनफोन झूम एस' हा स्मार्टफोन लाँच केला आहे. ड्युअल रिअर कॅमेरा आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी ही या फोनची खास वैशिष्ट्य आहेत. भारतात या फोनची किंमत 26 हजार 999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.


जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने हा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनचा कॅमेरा हे खास आकर्षण असणार आहे. हायटेक फीचर्ससह 12 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही बॅटरी 42 दिवसांचा स्टँडबाय टाईम देईल, असा दावा कंपनीने केला आहे. शिवाय रिव्हर्स चार्जिंग फीचरही देण्यात आलं आहे.

सध्या हा फोन अँड्रॉईड 6.0.1 मार्शमेलो सिस्टम सपोर्टेड आहे. मात्र लवकरच अँड्रॉईड नॉगट 7.0 अपडेट मिळणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. फ्लिपकार्टवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे.

झेनफोन झूम S चे फीचर्स

  • अँड्रॉईड 6.0 सिस्टम

  • 5.5 इंच आकाराची स्क्रीन

  • 2GHz ऑक्टा कोअर प्रोसेसर

  • 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • 12 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा

  • 4 GB रॅम, 32 GB स्टोरेज

  • 5000mAh क्षमतेची बॅटरी