मुंबई: तायवानची टेक कंपनी आसूसने बुधवारी भारतात जगातील पहिला लिक्विड कूल्ड लॅपटॉप रिपब्लिक ऑफ गेमर्स (ROT) GX700 लाँच केला. याची किंमत 4,12,990 रुपये आहे.


 

कंपनीने सांगितले की, हा लॅपटॉप नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे बनवण्यात आला असून यामध्ये डिटॅचेबल आरओजी हायड्रो ओव्हर लॉकिंग कुलिंग मॉड्यूल आहे. यामुळे याचा कीबोर्ड आणि मॅनिटर वेगळा करता येऊ शकतो. हा लॅपटॉप 6G च्या इंटल मोबाईल के-एसकेयू (स्कायलेक) प्रोसेसरने लॅस आहे.

 

हा लॅपटॉप विशेष आरओजीची थीम अटॅचीमध्ये पॅक आहे. यात हायड्रो ओव्हरलॉकिंग (ही कॉम्प्यूटर हार्डवेअरची स्पीड वाढवणारी संरचना आहे) यामध्ये केवळ लॅपटॉपला थंड ठेवण्याचीच क्षमता नसून यामुळे ओव्हर लॅकिंगला अधिक सक्षम बनवते. हा लॅपटॉप 48% आपला स्पीड वाढवू शकतो. तसेच याची 64 जीबी डीडीओर 4 मेमरी 43% ओव्हर लॉक करू शकतात.