नवी दिल्ली : जगात स्मार्टफोन्सचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे का? गेल्या 13 वर्षात पहिल्यांदाच अॅपलची विक्री घटल्यानंतर असा प्रश्ना उपस्थित केला जातो आहे. गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या मतानुसार हे डिव्हाईस आता कालबाह्य ठरणार आहेत. पिचाई यांच्या भविष्यवाणीनुसार कम्प्युटर्सची जागा आर्टिफिशिअल इंटेलीजेंस (AI) असणारं असिस्टेंट्स घेणार आहे.

 

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई गूगलच्या वार्षिक कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी क्लाऊड प्लॅटफॉर्म आणि एआयसंबंधित योजनांवरही प्रकाश टाकला. गूगलची मूळ कंपनी अल्फाबेटकडून दरवर्षीय लॅरी पेज आणि सर्जी बिन स्टॉरहोल्डर्सला पत्र लिहिलं जातं, ज्यामधून सध्या विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानावर भाष्य केलं जातं.

 

पिचाई यांनी या पत्रात म्हटलंय की, “गेल्या एका दशकापर्यंत कम्प्युटिंगना मोठ्या कम्प्युटर्सचा पर्याय मानलं जात होतं. मात्र, कम्प्युटर डेस्कवर ठेवलं जात होतं. भविष्यात कम्प्युटिंग प्रोसेसर्स आणि सेन्सर्स इतके विकसित होतील की, सुपरकॉम्प्युटर्सही खिशात ठेवू शकता.”

 

आगामी काळ असा असेल की, कम्प्युटर अशा स्वरुपात असेल की, इंटेलिजेंस असिस्टिंटसारखं तुम्हाला दिवसभर मदत करेल. आपण आता ‘मोबाईल फर्स्ट’कडून ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंस फर्स्ट वर्ल्ड’कडे जात आहोत, असेही पिचई म्हणाले.

 

आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (AI) रिसर्चसाठी अल्फाबेटच सर्वात पुढे आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डिव्हाईस माणसासारखं बोलू शकेल.