अॅपल यावर्षी तीन आयफोन लॉन्च करणार!
एबीपी माझा वेब टीम | 06 Mar 2017 10:43 PM (IST)
न्यूयॉर्क : अॅपल यावर्षी तीन आयफोन लाँच करणार आहे. यामध्ये एक 5.8 इंच आकाराच्या स्क्रिनचा फोन असेल, ज्याचं नाव 'आयफोन एक्स' असण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर दोन आयफोन 7 सीरिजचे असतील, त्यांचं नाव 'आयफोन 7s' आणि 'आयफोन 7s प्लस' असेल, असं वृत्त निक्केई या वृत्तपत्राने दिलं आहे. अॅपलचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा आणि सर्वात स्लीम आयफोन असेल, असंही निक्केईच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. शिवाय आयफोन 8 मध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा असेल, अशीही माहिती आहे. यावर्षी अॅपलचा दहावा वर्धापन दिन आहे. त्यामुळे कंपनीकडून यूनिक आयफोन बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे. रिपोर्टनुसार आयफोन एक्स किंवा आयफोन 8 मध्ये 5.8 इंच आकाराची स्क्रिन असेल. तर आयफोन 7 च्या तुलनेत या फोनचं स्टोरेज अधिक असेल. तर या फोनमध्येही आयफोन 7 प्रमाणेच ड्युअल कॅमेरा असेल. बॅटरी बॅकअप वाढवला जाऊ शकतो आणि होम बटणची जागा बदलली जाऊ शकते.