Airtel Surprise offer : 13 मार्चपासून एअरटेल मोफत डेटा देणार!
एबीपी माझा वेब टीम | 06 Mar 2017 08:27 PM (IST)
मुंबई : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेल पोस्टपेड ग्राहकांना 13 मार्चपासून मोफत डेटा देणार आहे. ‘Airtel Surprise’ या ऑफरनुसार ग्राहकांना कंपनीकडून प्रमोशनल मेल पाठवला जाणार आहे. कोणत्या ग्राहकाला किती डेटा मिळेल, ते एअरटेलच्या अॅपवर पाहता येऊ शकेल. ग्राहकांना एअरटेल नेटवर्कचा फायदा घेता यावा, यासाठी मोफत डेटा दिला जात आहे. या सरप्राईज ऑफरचा आनंद 13 मार्चपासून घेता येईल, असा मेल एअरटेलकडून पोस्टपेड ग्राहकांना पाठवला जात असल्याचं वृत्त 'गॅजेट 360' ने दिलं आहे. दरम्यान एअरटेलने शनिवारी जिओला टक्कर देण्यासाठी आणखी एक ऑफर आणली आहे. ग्राहकांना दररोज 1 जीबी 4 जी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. एअरटेलच्या या प्लानची किंमत 345 रुपये असेल. यामध्ये ग्राहकांना 500 एमबी डेटा दिवसा आणि 500 एमबी डेटा रात्री मिळणार आहे. तसंच 28 दिवस याची व्हॅलिडिटी असेल. 31 मार्चपर्यंत 4 जी युझर्स एअरटेलच्या या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. 31 मार्चच्या आधी ही ऑफर घेणाऱ्या युझर्सना 345 रुपये किंमतीत पुढील 11 महिने हा प्लान घेता येईल. संबंधित बातम्या: