मुंबई: अॅपलचं नाईकी प्लस स्मार्टवॉच भारतात 28 ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टवॉच्या 38mm डायलची किंमत 32,900 रु. आणि 42 mm डायलची किंमत 34,900 रु. आहे.
हे स्मार्टवॉच अॅपल नाईकी डॉट कॉम आणि नाईकीच्या स्टोअर आणि अॅपलच्या अधिकृत रिटेलरकडे उपलब्ध असणार आहे.
अॅपलचे सीईओ जेफ विलियम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आतापर्यंत अॅपलच्या स्मार्टवॉचबद्दल ग्राहकांच्या जबरदस्त प्रतिक्रिया मिळत आहे. त्यामुळे आम्ही नाईकी प्लस वॉचच्या लाँचिंगसाठी फारच उत्साहित आहोत.'
अॅपल वॉच विक्रीमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता नवं अॅपल वॉच हे स्विमप्रुफ असणार आहे. त्यामुळे हे घड्याळ घालून तुम्ही स्विमिंग करु शकतात. अॅपल वॉचसाठी नाईकीसोबत करार करण्यात आला आहे. या नव्या अॅपल वॉचचं नाव Nike+ असणार आहे. या वॉचमध्ये बिल्ट-इन जीपीएस असणार आहे.