iOS 16 : यावर्षीच्या Apple Worldwide Developers Conference (WWDC) ला एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी बाकी असताना Apple काय घोषणा करू शकते याबद्दलच्य अफवांची अधिक तपशीलवार चर्चा होत आहे. ताज्या माहितीनुसार, अॅपलच्या पुढील प्रमुख मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेडमध्ये लॉक स्क्रीन सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता आहे.
'ब्लूमबर्ग'ने दिलेल्या अहवालानुसार iOS 16 लॉक स्क्रीन आणि मेसेजेस अॅपला लक्षणीयरित्या बदल करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नेहमी-ऑन डिस्प्लेच्या अफवा देखील परत आल्या आहेत. सध्या,आयफोन लॉक स्क्रीन युझर्सना विजेट्समध्ये प्रवेश, कंट्रोल सेंटर फंक्शन आणि नोटिफिकेशन रीड करता येतात.तसेच न्यूज अपडेट वाचण्यासाठी, हवामान आणि कधीकधी कॅल्क्युलेटर किंवा फ्लॅशलाईटसाठी याचा वापर करतो. iOS 16 मध्ये वॉलपेपर आणि इतर महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता आहे.
iOS चे पुढीव व्हर्जन नेहमी-ऑन लॉक स्क्रीन देखील सादर करू शकते. गेल्यावर्षी, आलेल्या अफवांमध्ये आयफोन 13 प्रो नेहमी चालू असलेल्या डिस्प्लेसह पाठवेल जे बॅटरीचे लाईफ वाचवण्यासाठी वापरात नसताना त्याचा रीफ्रेश दर गतिशीलपणे 10Hz पर्यंत कमी करेल.हे फिचर साकार झाले नाही. परंतु, iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये दिसू शकते. मागील चर्चेनुसार 14 प्रो 48-मेगापिक्सेल कॅमेरा,पेरिस्कोप लेन्स,ऑटोफोकस फ्रंट-फेसिंग कॅमेरा आणि नवीन A 16 प्रोसेसरसह येईल.
रिपोर्टनुसार मेसेज अॅप सोशल मीडियाप्रमाणेच ऑडिओ मेसेज प्राप्त करू शकेल. Apple TV चे tvOS हे स्मार्ट होम डिव्हाइसेसशी अधिक क्लोज जोडलेले असेल, तर macOS ला काही रीडिझाइन केलेले अॅप मिळू शकतात. डेव्हलपर स्टीव्ह ट्रफटन-स्मिथला एक वेबकिट अपडेट सापडला जो iPad मल्टीटास्किंगसाठी महत्त्वपूर्ण अपग्रेड सूचित करतो.बदलांमुळे ते iPadOS 16 मध्ये येऊ शकते,कीबोर्ड आणि माऊस कनेक्ट केलेले असताना ते लॅपटॉपसारखे कार्य करते.
इतर महत्त्वाच्या बातम्या