AirPods Pro 2 : Apple लवकरच AirPods Pro 2 लाँच करणार आहे. लॉन्च होण्याआधीच, AirPods Pro 2 बाबत चर्चा होताना दिसत आहेत. माहितीनुसार, AirPods Pro 2 मध्ये H1 चिपसाठी नवीन सिस्टम-इन-पॅकेज (SIP) असेल. यामध्ये अॅक्टिव्ह नॉइज कॅंसलेशन सपोर्ट मिळणे देखील अपेक्षित आहे. तसेच नवीन SIP उत्तम परफोर्मंसेस आणि स्पेसिफेकेशनसह येऊ शकते.


आणखी दोन नवीन फिचर्स जोडले


यामध्ये 'फाइंड माय' फंक्शनमध्येही बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यात दोन नवीन फिचर्स देखील जोडले जातील अशी अपेक्षा आहे. यासोबतच हार्ट रेट मॉनिटरिंग तसेच एक हियरिंग एड मोड देखील आढळू शकतो. त्याची केस USB-C पोर्ट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल अशी अपेक्षा आहे. असे मानले जाते की, नवीन AirPods Pro 2 चा लूक देखील जुन्या AirPods Pro सारखाच असेल. AirPods Pro 2 ला दोन्ही इयरबड्समध्ये प्रेशर सेंसिटिव बटण मिळण्याची अपेक्षा आहे.


बॉडी टेंपरेचर सेंसर देखील मिळू शकते


एअरपॉड्स प्रो 2 हार्ट रेट सेन्सर वापरून शरीराच्या तापमानाचे परीक्षण करण्यास सक्षम असेल. एअरपॉडसोबतट एक स्पीकर देखील दिला जाईल. फाइंड माय फंक्शन निवडल्यावर हा आवाज प्ले होईल.


ऑडिओमध्ये होऊ शकतात हे बदल 
असे सांगण्यात येते की, ऑडिओमध्ये देखील खूप सुधारणा केली जाऊ शकते. हे उच्च-अ‍ॅम्प्लिट्यूड ड्राइव्ह युनिट्स आणि उच्च डायनॅमिक रेंज अॅम्प्लिफायर्सच्या कॉम्बिनेशनसह फिट केले जाऊ शकते, जे स्वयंचलितपणे EQ वर कार्य करू शकतात. AirPods 2 ला ट्रॅकिंग आणि ऑडिओ शेअरिंगसाठी स्थानिक ऑडिओचा पर्याय देखील मिळण्याची अपेक्षा आहे. Apple ने नुकतेच AirPods 3rd Generation लाँच केले आहे. हे देखील प्रो प्रमाणेच डिझाइन केलेले होते, परंतु नॉइज कॅंसिलेशन मोड नव्हते.


संबंधित बातम्या


Apple Watch : Apple वॉचवरून स्मार्टफोनशिवाय चालणार YouTube, कसे ते जाणून घ्या