आयफोन 7 प्लसच्या ब्लॅक कलर व्हेरिएंटचे फोटो लीक
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2016 10:42 AM (IST)
मुंबई: अॅपल आयफोन 7 आणि 7 प्लस सात सप्टेंबरला लाँच होणार आहे. पण आता त्याआधीच 7 प्लसच्या ब्लॅक कलर व्हेरिएंटचे फोटो लीक झाले आहेत. या फोटोमध्ये फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आलं आहे. लीक झालेल्या फोटोमध्ये बॅक पॅनलला आणि ड्यूल कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश दिल्याचं दिसत आहे. या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, येणाऱ्या आयफोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक पोर्टशिवाय असणार आहे. आयफोन 7मध्ये 3 जीबी रॅम असण्याची शक्यता आहे. तसंच वायरलेस चार्जिंग देखील देण्यात येणार असल्याचं समजतं आहे. आयफोनमध्ये फोर्स टच होम बटन देण्यात येण्याची शक्यता आहे. यावेळेस अॅपल 32 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी मॉडेल्स लाँच करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, आयफोन 7मध्ये 12 मेगापिक्सल कॅमेरा असण्याची शक्यता आहे.