मुंबई: हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं अनेकांना आजवर आपला जीव गमवावा लागला आहे. अशा घटनांमध्ये योग्य वेळेत मदत न मिळाल्यानं मृत्यूचं प्रमाण जास्त असतं.

भारतासह जगभरात ही समस्या मोठ्या प्रमाणात आहे. अशावेळी मदत पोहचविण्यासाठी एका डच विद्यार्थ्यानं 'अॅम्ब्युलन्स ड्रोन' हे डिव्हाईस तयार केलं आहे.

19 हजार डॉलर किंमतीचं हे डिव्हाईस फारच उपयुक्त आहे. हे डिव्हाईस इमरजन्सी मोबाइल कॉल ट्रॅक करतं आणि जीपीएसच्या साह्याने निश्चित ठिकाणी पोहचतं. हे ड्रोन चालविणाऱ्या ऑपरेटर्सला ऑन बोर्ड कॅमेऱ्याच्या मदतीनं रुग्णाला पाहता येतं. या ड्रोनमधील काही प्रथमोपचार करणारी उपकरणं असणार आहे. ज्यामुळे रुग्णाच्या हृदयाचे ठोके नियंत्रित करता येणार आहेत.

हा अॅम्ब्युलन्स ड्रोन 12 किमीच्या रेंजमध्ये 100 किमी प्रतितास इतक्या वेगाने उडू शकतो. त्यामुळे तो अवघ्या काही मिनिटात पेशंटपाशी पोहचू शकतो. ज्यामुळे रुग्ण वाचण्याची शक्यता जवळजवळ 80 टक्के वाढते.

VIDEO: