या बॅण्डचा यूजर्सला बराच फायदा होऊ शकतो. कारण की, यूजरची दिवसभरातील शारीरिक हालचाल किती आहे आणि किती कॅलरीज कमी झाल्या याचा हिशोब हा बॅण्ड ठेवतो.
एमब्रानचे संचालक गौरव दुरेजा यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, 'पॉवर बँक आणि ऑडिओ क्षेत्रात आम्ही स्वत:ला सिद्ध केल्यानंतर आता आम्ही वेयरेवल जगतात पाऊल टाकलं आहे. फिटनेस चाहत्यांना लक्षात घेऊन आम्ही हा बॅण्ड लाँच केला आहे. हे फिटनेस ट्रॅकिंग डिव्हाइस स्टायलिश कॉम्बिनेशनमध्ये तयार करण्यात आलं आहे.'
फ्लेक्सी फिटला आयओएस किंवा अँड्रॉईड स्मार्टफोनशी जोडता येणार आहे. हा बॅण्ड वॉटर रेसिस्टेंट आणि डस्ट प्रूफ आहे. या स्मार्टबॅण्डमध्ये 60 mAh बॅटरी देण्यात आली आहे.