व्हॅलेंटाईन डे सेल : मोटोरोलाच्या 'या' स्मार्टफोनवर तब्बल 6 हजारांची सूट
एबीपी माझा वेब टीम | 13 Feb 2018 03:54 PM (IST)
व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत मोटोरोलाने एका स्पेशल सेलचं आयोजन केलं आहे.
मुंबई : व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत मोटोरोलाने एका स्पेशल सेलचं आयोजन केलं आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनवर सुरु असलेल्या या सेलमध्ये मोटोरोलाच्या स्मार्टफोनवर तब्बल 6 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये मोटो G5s प्लसवर दोन हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन 13,999 रुपयांना उपलब्ध आहे. यासोबतच या स्मार्टफोनवर 2 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही आहे. मोटोचा दुसरा स्मार्टफोन G5s वर 2 हजार रुपयांपर्यंत सूट आहे. त्यामुळे हा फोन 11,999 रुपयात खरेदी करता येईल. दरम्यान, मोटोच्या G5 प्लस या स्मार्टफोनवर सध्या बंपर डिस्काउंट देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनवर तब्बल सहा हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन अवघ्या 10,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. मोटो G5 स्मार्टफोनवर व्हॅलेंटाईन सेलमध्ये 3500 रुपयांची सूट देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 8499 रुपयात खरेदी करता येणार आहे.