Amazon Great Indian Festival Sale 2022 : अॅमेझॉनचा सर्वात मोठा फेस्टिव्हल सीझन सुरु होतोय. अॅमेझॉन प्राईम ग्राहकांसाठी तर आज रात्री 12 पासूनच हा सेल सुरु होतोय. या सेलमध्ये अॅमेझॉन यूजर्सना स्मार्टफोनवर अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. या सेलमध्ये स्मार्टफोनवर वर्षभरातील सर्वोत्तम डील उपलब्ध असतील. या स्मार्टफोनवर अनेक बंपर ऑफर्स देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी तयार राहा.
Samsung Galaxy M53 5G : या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. डिव्हाईसमध्ये 108MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि MTK D900 Octa Core प्रोसेसर आहे. यात 8GB पर्यंत RAM सह 128GB स्टोरेज आहे. त्याची किंमत 21,999 रुपयांपासून सुरू होते. मात्र, Amazon सेलमध्ये हा स्मार्टफोन तुम्ही केवळ 19,999 रुपयांच्या किमतीत विकत घेऊ शकता.
IQOO Z6 44W : हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरवर आधारित आहे. यामध्ये 44W फ्लॅश चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी आहे. तर, डिव्हाईस 50MP AI रिअर कॅमेरा सेटअपवर काम करते. या स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले आहे. यात 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज आहे. त्याची किंमत 13,999 रुपयांपासून सुरू होते. सेलमध्ये हा स्मार्टफोन 11,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे.
Redmi K50i 5G : Redmi च्या या 5G स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत RAM सह 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज आहे. Dimensity 8100 SoC प्रोसेसर स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. डिव्हाईसमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. डिव्हाईस 64MP ISOCELL प्रायमरी कॅमेऱ्यासह सुसज्ज आहे. यात 5080mAh बॅटरी आहे. स्मार्टफोनची किंमत 24,999 रुपयांपासून सुरू होते. हे Amazon सेलमध्ये 19,999 रुपयांना उपलब्ध आहे.
Xiaomi 12 Pro 5G : Xiaomi च्या या 5G स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत RAM सह 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज आहे. यात 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. डिव्हाईसमध्ये 6.73 इंच डिस्प्ले आहे. यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर आणि 4600mAh बॅटरी आहे. फोनची किंमत 62,999 रुपयांपासून सुरू होते. हे सेलमध्ये 45,499 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे.
OnePlus 10T 5G : या OnePlus फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 6.7-इंचाचा डिस्प्ले आणि Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. हँडसेट 4800mAH बॅटरीसह येतो. यात 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. फोनची किंमत 49,999 रुपयांपासून सुरू होते. हे सेलमध्ये 44,999 रुपयांना उपलब्ध केले जाईल.
महत्वाच्या बातम्या :