Amazon Astro : अॅलेक्सानंतर आता येणार अॅस्ट्रो येणार आहे.  तुमच्या घराचं रक्षण करण्याबरोबरच घरातील काम करण्यासाठी आणि त्यांची आठवण करून देण्यासाठी चक्क रोबो उपलब्ध झाला आहे.  तसा रोबो आपल्यासाठी नवा नाही. पण अमेझॉननं खास घरासाठी खास स्मार्ट रोबो लाँच केला आहे.

Continues below advertisement


अमेझॉन अॅस्ट्रो असं या रोबोचं नाव आहे. हा रोबो अॅनिमेटेड कॅरेक्टर वॉल ई सारखा दिसतो. या रोबोत कनेक्टिव्हिटीसाठी कॅमेरा आणि सेन्सर देण्यात आला आहे.  या रोबोत एआय तंत्रज्ञान वापरण्यात आलं असून अॅलेक्सा सपोर्टही देण्यात आला आहे. रोबोला 17 इंचाच्या दोन स्क्रीन दिल्या असून त्या डोळ्यांचे काम करणार आहेत. तर रोबोला चाकं लावलेली असल्यामुळे हा घरात कुठेही जाऊ शकतो. चालताना मध्ये काही अडथळा आल्यास हा रोबो स्वतःच रस्ताही बदलू शकतो.



रोबो घरातील सदस्यांना आवश्यक कामांची आठवणही करून देऊ शकणार आहे. हा रोबो चालू शकतो, पाहू शकतो आणि तुम्ही सांगितलेल्या आज्ञाही पाळणार आहे. या रोबोची किंमत एक हजार डॉलर म्हणजेच जवळ जवळ 75 हजार रुपये आहे. या वर्षाच्या शेवटी हा रोबो बाजारात विक्रीस उपलब्ध होणार आहे.