मुंबई : उत्सवांच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटची चढाओढ सुरु होते. यावर्षीही फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज आणि अमेझॉनने ग्रेट इंडिया सेलची घोषणा केली आहे. त्यामुळे यावर्षी नवरात्रीच्या काळात ग्राहकांसाठी ऑफर्सची दिवाळी असेल.
फ्लिपकार्टवर फोन खरेदी करण्यासाठी मोठ्या ऑफर्स असण्याची शक्यता आहे. कारण Huawei P9 हा 39 हजार 999 रुपयांचा फोन केवळ 14 हजार 999 रुपयांमध्ये मिळणार आहे. म्हणजे जवळपास 25 हजार रुपयांची सूट मिळणार आहे.
सॅमसंग गॅलक्सी S7 या फोनची किंमत किंमत 46 हजार रुपये आहे. मात्र हा फोन 16 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह 29 हजार 990 रुपयांमध्ये मिळेल. विशेष म्हणजे मोटो C प्लस हा फोन केवळ 5 हजार 999 रुपयात मिळणार आहे. फ्लिपकार्ट असुस, मोटोरोला आणि एचटीसीच्या फोन्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देणार आहे.
या सेलमध्ये लाईफस्टाईल आणि फॅशनच्या वस्तूंवरही मोठी सूट असेल. सोबतच कॅमेरा, प्रिंटर आणि अॅपल आयपॅडवरही मोठ्या प्रमाणात सूट दिली जाणार आहे. फ्लिपकार्टचा सेल 20 सप्टेंबरला, तर अमेझॉनचा सेल 21 सप्टेंबरपासून सुरु होईल.
40 हजारांचा फोन 15 हजारात, फ्लिपकार्ट, अमेझॉनवर बंपर ऑफर्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2017 09:33 PM (IST)
फ्लिपकार्टवर फोन खरेदी करण्यासाठी मोठ्या ऑफर्स असण्याची शक्यता आहे. फ्लिपकार्टचा सेल 20 सप्टेंबरला, तर अमेझॉनचा सेल 21 सप्टेंबरपासून सुरु होईल.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -