मुंबई: रिलायन्स जिओमुळे टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा वाढली आहे. आता एअरटेलनेही अनलिमिटेड कॉलसाठी myPlan इनफिनिटी ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये दोन पोस्टपेड प्लान 549 आणि 799 रु. आहेत.
549 प्लानमध्ये अनलिमिटेड STD आणि लोकल कॉलिंग, 100 मेसेज, 3जीबीपर्यंत 4जी डेटा, तर 3जी हँण्डसेट यूजरसाठी 1 जीबी डेटा मिळेल. तर 799च्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत 5 जीबी 4जी डेटा मिळणार आहे.
याआधी प्रीपेड ग्राहकांसाठी एअरटेलनं फ्री कॉलिंग प्लानची घोषणा केली होती. यामध्ये ४जी डेटासह अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉल मिळणार आहे. 145 रुपयात हा प्लान मिळणार आहे. तर 345 रुपयांच्या प्लानमध्ये देशातील कोणत्याही नेटवर्कवर लोकल-एसटीडी कॉलसोबत 4जी डेटा मिळणार आहे. प्रीपेड ग्राहकांसाठी दोन्ही प्लान 28 दिवस वैध असणार आहे.