मुंबई: टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलनं आपल्या 3जी आणि 4जी डेटा प्लानच्या किंमतीत भरघोस कपात करण्याची घोषणा कंपनीनं केली आहे. कंपनीनं ग्राहकांसाठी 'मेगा सेव्हर पॅक' लाँच केला आहे. या अंतर्गत यूजर्सला 1 जीबी डेटा अवघ्या 51 रुपयात मिळणार आहे.


 

एअरटेलनं दावा केला आहे की, या कपातीनंतर यूजर्सची जवळजवळ 80 टक्के बचत होणार आहे. रिलायन्स जिओच्या प्री प्रीव्ह्यू सेवा लाँच होणार असून त्यासाठी कंपनीनं ही कपात केली असल्याचं बोललं जात आहे.

 

कंपनीनं दोन स्कीम जारी केल्या आहेत. यामध्ये 1498चं स्पेशल रिचार्ज करावं लागणार आहे. 1498 रुपयाचं रिचार्ज केल्यानंतर प्रीपेड ग्राहकांना 28 दिवसासाठी एक जीबी डेटा मिळणार आहे. त्यानंतर ग्राहकांना 12 महिन्यांपर्यंत फक्त 51 रुपयांच्या रिचार्जवर एक जीबी डेटा मिळवता येणार आहे.

 
कंपनीचा दुसरा प्लान 748 रुपयाचा आहे. यामध्ये प्रीपेड यूजर्सला 748 रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे. त्यानंतर दर महिन्याला 99 रुपयांच्या रिचार्जवर एक जीबीपर्यंत डेटा मिळवता येणार आहे. हा प्लान 6 महिन्यापर्यंत व्हॅलिड असणार आहे.

 

दरम्यान, दुसऱ्या कंपन्यांही येणाऱ्या काही दिवसात इंटरेनटच्या दरात कपात करण्याची शक्यता आहे.