मुंबई : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलने प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन डेटा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी दररोज 3G/4G डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे.


रिलायन्स जिओच्या 999 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी हा प्लॅन आणण्यात आला आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी 90GB डेटा दिला जातो. तर एअरटेलच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 3G/4G डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळेल.

दरम्यान एअरटेल ग्राहक या प्लॅनसाठी पात्र आहेत का, याची खात्री एअरटेलची वेबसाईट किंवा MyAirtel अॅपवर करावी लागेल. त्यानंतर 999 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर 28 दिवसांसाठी दररोज 4GB डेटा मिळेल.

(नोट : या प्लॅननुसार रिचार्ज करण्यापूर्वी हा प्लॅन तुमच्या नंबरसाठी वैध आहे किंवा नाही याची खात्री संबंधित कंपनीच्या वेबसाईटवरुन करा.)