Tech News | बर्‍याचदा गर्दीच्या ठिकाणी अनेकांचे फोन हरवतात किंवा चोरीला जातात. फोन चोरीनंतर आपल्याला त्यातील डेटा ते कॉन्टॅक्ट्सच्या समस्यांना सामोरे जावं लागतं. फोन चोरीनंतर आपण पोलिसात तक्रार दाखल केली तरी फोन परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते. मात्र फोन हरवल्यानंतर तो ट्रेस केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया खास टिप्स आणि ट्रिक्स.

Anti Theft Alarm

आपला फोन चोरीला जाऊ शकतो, त्यामुळे आपल्याला तशी भीती असल्यास, लगेच आपल्या फोनमध्ये अँटी थेफ्ट अलार्म अ‍ॅप डाउनलोड करा. या अ‍ॅपचा फायदा असा आहे की जर एखाद्याने आपला फोन चोरी करण्याचा प्रयत्न केला तर आपोआपच आपल्या फोनमध्ये अलार्म वाजण्यास सुरुवात होईल. दुसरीकडे, जर एखाद्याने गर्दी असलेल्या ठिकाणी आपला फोन चोरी करण्याचा प्रयत्न केला तर तो अलार्म आपल्याला सावध करेल.

Thief Tracker

जर फोन चोरीला गेला आणि आपल्या फोनमध्ये थेफ्ट ट्रॅकर अॅप असेल तर हा अॅप आपल्याला फोन शोधण्यात मदत करेल. या अ‍ॅपच्या मदतीने आपल्याला चोराबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकते. या व्यतिरिक्त, हे अ‍ॅप आपल्याला चोरणार्‍याचा फोटो पाठवेल.

Lookout Security and Antivirus

लुकआउट सिक्युरिटी आणि अँटीव्हायरस अ‍ॅपद्वारे आपण आपला चोरीला गेलेला किंवा हरवलेल्या फोनचा शोध घेऊ शकता. त्याच वेळी, चोरीनंतर चोर फोन बंद करतो तर या अॅपद्वारे फोनच्या शेवटच्या जागेची माहिती मिळते. शेवटचं लोकेशन मिळाल्यानंतर फोन शोधणे सोपे होईल.