मुंबई: जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'फ्रीडम 251'ला टक्कर देण्यासाठी आता आणखी एक स्वस्त स्मार्टफोन बाजारात आला आहे. आता अवघ्या 501 रुपयात चॅम्पवन c1 हा स्मार्टफोन मिळणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरसोबत 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल मेमरी मिळणार आहे. चॅम्पवन c1 स्मार्टफोन हा स्टार्ट-अप चॅम्पवन कम्युनिकेशनचा एक भाग आहे.
22 ऑगस्टपासून सुरु झालेल्या 'चॅम्प1 इंडिया' या वेबसाईटवर तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. २ सप्टेंबरपासून पासून या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार असून यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय देखील आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5 इंच डिस्प्ले आणि 1.3 क्वॉड कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनची सध्याची किंमत फक्त विक्री वाढविण्यासाठी आहे. संपूर्ण देशात याची सुरुवात झाल्यानंतर हा स्मार्टफोन बाजारात 8000 रु. किंमतीला मिळणार आहे.