आता 'डार्क नेट' गेमची धास्ती, गोवंडीतील मुलगा पहिली शिकार?
एबीपी माझा वेब टीम | 04 Nov 2017 10:10 AM (IST)
ब्लू व्हेल गेमसारखाचा डार्क नेट गेमही तितकाच धोकादायक आहे. त्याची प्रचिती मुंबई जवळच्या गोवंडी परिसरात आली.
मुंबई: ब्लू व्हेल गेमची डोकेदुखी अजूनही कायम असतानाच, आता ‘डार्क नेट’ हा नवा गेम नवी डोकेदुखी ठरत आहे. ब्लू व्हेल गेमसारखाचा डार्क नेट गेमही तितकाच धोकादायक आहे. त्याची प्रचिती मुंबई जवळच्या गोवंडी परिसरात आल्याची धास्ती आहे. दहावीत शिकणारा 15 वर्षाचा मुलगा घर सोडून गेला आहे. त्याबाबतची तक्रार त्याच्या पालकांनी गोवंडी पोलिसात दिली आहे. मात्र या मुलाने 29 ऑक्टोबरला घर सोडताना 'मला शोधू नका मी मेलो असे समजा' अशी चिट्ठी लिहून, घरातील 15 हजार रुपये घेऊन गेला. आत्याकडे राहात असणाऱ्या या मुलाचे पालक मोठ्या मीडिया हाऊसमध्ये असल्याचं समजतं. हा मुलगा काही दिवसांपासून डार्क नेट गेम खेळत असल्याचं त्याची मित्रांनी सांगितलं. हा गेम नेमका काय आहे, कसं खेळतात याबाबत अधिक माहिती नसली, तरी हा गेमही ब्लू व्हेलसारखाच धोकादायक असल्याचं सांगण्यात येतं. याप्रकरणी गोवंडी पोलिसांसह, क्राईम ब्रांच, दहशतवादविरोधी पथक हेदेखील या मुलाचा शोध घेत आहेत. संबंधित बातम्या ब्लू व्हेल गेमची मास्टर माईंड सापडली, 17 वर्षीय मुलीला बेड्या ब्लू व्हेल गेमच्या नादात तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न