मुंबई : फेसबुकवर सर्वाधिक व्हिडिओ पाहिल्या जाणाऱ्या पेजमध्ये एबीपी माझा राज्यात पहिल्या, तर देशात सहाव्या क्रमांकावर आहे. सोबतच सर्वाधिक व्हिडिओ पाहिल्या जाणाऱ्या टॉप 10 यादीत एबीपीचे तीन पेज आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर एबीपी न्यूज (हिंदी), पाचव्या क्रमांकावर एबीपी लाईव्ह (इंग्लिश) आणि सहाव्या क्रमांकावर एबीपी माझा आहे.
सोशल व्हिडिओ इंटिलिजेन्स या सोशल मीडियावरील व्हिडिओची रँकिंग जारी करणाऱ्या एजन्सीने ही आकडेवारी जारी केली आहे. एबीपी माझाच्या पेजवर ऑगस्ट महिन्यात 12 कोटी 4 लाख 59 हजार 793 जणांनी व्हिडिओ पाहिले. तर एबीपी न्यूजने या यादीत सलग दुसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावलं.
एबीपी माझाचं फेसबुक पेज लाईक्सच्या बाबतीतही राज्यात अगोदरपासूनच अव्वल आहे. एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांनी फेसबुक पेज व्हिडिओच्या बाबतीतही अव्वल स्थानावर कायम ठेवलं. एबीपी माझाच्या फेसबुक पेजला सध्या 34 लाख 7 हजार 244 लाईक्स आहेत.
एबीपी माझाच्या या कामगिरीमध्ये वाचक आणि प्रेक्षकांची साथ तर आहेच, शिवाय एबीपी माझाच्या डिजीटल टीमची मेहनतही तेवढीच महत्त्वाची आहे. एबीपी माझाच्या डिजीटल टीमकडून प्रत्येक ब्रेकिंग न्यूज, बातमी आणि व्हिडिओ पॅकेज प्रेक्षकांपर्यंत क्षणाक्षणाच्या अपडेटसह पोहोचवले जातात.
एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे ही कामगिरी केली आहे. सर्व प्रेक्षक आणि वाचकांचे मनापासून आभार. प्रत्येक बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हीही https://www.facebook.com/abpmajha या पेजला भेट देऊ शकता.