5G Internet Launch Live updates : भारतात आजपासून 5G क्रांती, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नेटवर्क लाँच; लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

5G Services Launch : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात 5G इंटरनेट सेवा सुरु होणार आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 01 Oct 2022 01:15 PM
5G लाँच सोहळ्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या 5G इंटरनेट लाँच सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी पनवेल महानगर पालिका विद्यार्थांशी संवाद साधला. पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांशीही नी संवाद साधला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं 5G चं महत्त्व 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G चे फायदे आणि 5G सेवेचा देशामध्ये तंत्रज्ञानातील क्रांतीला कशी मदत होईल, याबद्दल माहिती दिली. परवडणारं तंत्रज्ञान आणि व्यापक नेटवर्कची गरज यासह डिजिटल इंडिया चळवळीला 5G नेटवर्कचा मोठा फायदा होणार आहे.

भारतात 85 कोटी इंटरनेट युजर्स

पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, 2014 मध्ये भारतात 25 कोटी इंटरनेट युजर्स होते, आज ही संख्या 85 कोटी झाली आहे. ग्रामीण भागातून इंटरनेट युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवीन आणि जुन्या युजर्सना इंटरनेटच्या 5G सेवेचा मोठा फायदा होईल.

5G नेटवर्कमुळे AR/VR वापराला अधिक सामर्थ्य येईल

5G नेटवर्कमुळे ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) वापराला देखील सामर्थ्य येईल. विशेषत: शिक्षणासारख्या क्षेत्रांमध्ये, जिथे मुलांना व्हीआर वर्गात अधिक जोमानं शिकवता आणि शिकता येईल.

PM Modi Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह

PM Modi Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह





देशात 5G सेवेचा शुभारंभ

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ


 





डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण देशात जिओचं 5G नेटवर्क पसरेल : मुकेश अंबानी

रिलायन्स जिओ डिसेंबर 2023 पर्यंत ग्रामीण भागासह संपूर्ण देशात 5G सेवा पोहोचवेल, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे.

5G तंत्रज्ञानाचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार

तज्ज्ञांच्या मते, 5G तंत्रज्ञानाचा भारताला खूप फायदा होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. आगामी काळात 5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडण्याची शक्यका. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर 5G नेटवर्कचा शुभारंभ हे एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. भारतील टेलिकॉम क्षेत्राचा ग्लोबल बेंचमार्कसोबत ताळमेळ बसवण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

'या' 13 शहरांमध्ये सुरु होणार 5G सेवा
भारतात आजपासून 5G इंटरनेट सेवा सुरु होणार असून मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, पुणे, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.
पंतप्रधानांना 5G नेटवर्कच्या क्षमतेची माहिती दिली जात आहे

पंतप्रधान मोदी यांना IMC मध्ये Jio 5G च्या क्षमतेचा डेमो आणि माहिती दिला जात आहे.

IMC कार्यक्रमाला पंतप्रधानांसाहल टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी



पंतप्रधान मोदींच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमाचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडलं आहे.





इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) परिषदेला सुरूवात

आज दिल्लीमध्ये इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) परिषदेला सुरूवात झाली आहे. हा कार्यक्रम 4 ऑक्टोबरपर्यंत चालेल. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G मोबाइल इंटरनेट सेवेचा शुभारंभ होणार आहे.

पार्श्वभूमी

5G Services To Be Launched on 1 October 2022 : आजपासून भारतात इंटरनेट सेवा सुस्साट होणार आहे. भारतात 1 ऑक्टोबर 2022 पासून 5G इंटरनेट सेवा (5G Internet Services) सुरु झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते दिल्लीमध्ये 5G  इंटरनेट सेवेचा शुभारंभ पार पडला. यामुळे भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. एका अहवालात समोर आलं आहे की, 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2023 ते 2040 दरम्यान 36.4 ट्रिलियन रुपये (सुमारे 455 अब्ज डॉलर) फायदा होण्याची शक्यता आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.