5G in India : देशात 5G लाँच करण्यात आले आहे. अनेक Android युजर्सना एअरटेलच्या 5G नेटवर्कचे सिग्नल देखील मिळत आहेत, परंतु आयफोनचे युजर्स अजूनही वाट पाहत आहेत. Airtel चे 5G नेटवर्क iPhone मध्ये उपलब्ध नाही कारण त्याला Apple कडूनच हिरवा सिग्नल मिळालेला नाही, पण लवकरच Airtel चे iPhone युजर्स देखील 5G ​​चा आनंद घेऊ शकतील अशी माहिती आहे.


iPhone ला 5G तेव्हाच सपोर्ट करेल, जेव्हा...
 एअरटेल ही पहिली कंपनी आहे जी भारतात पहिल्यांदा 5G लाँच करतेय. एअरटेलची 5G सेवा दिल्ली, कोलकाता, वाराणसी आणि मुंबई अशा 8 शहरांमध्ये सुरू झाली आहे. Airtel 5G Plus नंतर, जिओने दिल्ली, मुंबई, वाराणसी आणि कोलकाता येथे बीटा चाचणी म्हणून आपली 5G सेवा सुरू केली आहे. दरम्यान, Airtel ने त्यांच्या वेबसाइटवर सर्व फोनची यादी जारी केली आहे. ज्यामध्ये हे Airtel 5G Plus सपोर्ट करेल. या यादीमध्ये सर्व iPhones ची यादी देखील आहे, परंतु यादीसोबत हे देखील लिहिले आहे की, Airtel 5G Plus सर्व iPhone ला तेव्हाच सपोर्ट करेल जेव्हा Apple द्वारे सॉफ्टवेअर अपडेट जारी केले जाईल.


नवीन अपडेटनंतर लवकरच 5G नेटवर्क सिग्नल मिळेल


सध्या आयफोन युजर्सना नोटीफिकेशन मिळत आहे की, तुमच्या फोन निर्मात्याने अद्याप कोणतेही सॉफ्टवेअर अपडेट जारी केलेले नाही. तुम्ही Airtel Thanks अॅपवरून तुमच्या फोनमध्ये Airtel 5G Plus च्या सपोर्टबद्दल माहिती देखील मिळवू शकता. यासाठी मोबाईल उत्पादकांकडून सॉफ्टवेअर अपडेट जारी केले जातील. नवीन अपडेटनंतर लवकरच iPhone 12 आणि त्यावरील iPhone मॉडेल्सना 5G नेटवर्क सिग्नल मिळणे सुरू होईल.


Jio 5G लाँच
1 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G सेवा सुरू केली आहे. Airtel ची 5G सेवा 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या खास मुहूर्तावर Jio ची 5G सेवा सुरू होत आहे. एअरटेलची 5G सेवा 8 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे, तर Jio ची 5G सेवा बीटा ट्रायल म्हणून सुरू करण्यात आली आहे.


संबंधित बातम्या


सावधान !! 5Gचं आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी सक्रीय, सायबर गुन्हेगारीचा नवीन प्रकार