Xiaomi Civi 5G : चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने अलीकडेच आपला लेटेस्ट 5G स्मार्टफोन लाँच केला. Xiaomi Civi 5G या शानदार फोनची पहिली विक्री 30 सप्टेंबर रोजी झाली, ज्यात या फोनने विक्रीचे नवीन विक्रम प्रस्थापित केले. हा स्मार्टफोन इतका लोकप्रिय झाला की 230 कोटी रुपयांचे हँडसेट अवघ्या पाच मिनिटांत विकले गेले. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर आणि 64 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने हा फोन CNY 2,599 म्हणजेच 29,600 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च केला आहे. 


Xiaomi Civi 5G फोनचे स्पेसिफिकेशन


Xiaomi civi मध्ये 6.55-इंच फुल HD + OLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080x2,400 पिक्सेल आहे. त्याचा रिफ्रेश रेट 90 Hz आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर वापरण्यात आला आहे. यात 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे.


कॅमेरा


Xiaomi civi मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.


बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी


पॉवरसाठी, Xiaomi Civi मध्ये 4500mAh ची बॅटरी आहे, जी 55W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. असा दावा करण्यात आला आहे की या फोनची बॅटरी अवघ्या 36 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट सारखी सुविधा देण्यात आली आहे. शाओमीचा हा फोन ब्लू, ब्लॅक आणि पिंक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.


Xiaomi Civi भारतातील iQOO Z5 स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. iQOO Z5 या फोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आहे, ज्याचे रिझोल्यूशन (1080x2400 पिक्सेल) आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर वापरण्यात आला आहे. यात 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. IQOO Z5 स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असेल. 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड अँगल आहे. 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.