मुंबई : भारतीय ऑटोमोबाईल बाजारातही प्रीमियम आणि लक्झरी बाईकची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यातच आता जपानची प्रमुख दुचाकी निर्माती कंपनी कावासाकीने भारतीय बाजारात आपली शानदार बाईक 2019 कावासाकी वर्सेस 1000 लॉन्च केली आहे. या बाईकची शोरुम किंमत दहा लाख 69 हजार निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने बाईकची बुकिंग मागील वर्षी नोव्हेंबरपासूनच केली होती. या बाईकच्या बुकिंगसाठी दीड लाख रुपये टोकन म्हणून जमा करावा लागेल.

2019 कावासाकी वर्सेस 1000 ही बाईक एकमा मोटर शोमध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आली होती.

ही एक अॅडव्हेंचर टूअरर मोटरसायकल आहे. नवी बाईक पर्ल फ्लॅट स्टारडस्ट व्हाईट आणि मेटॅलिक फ्लॅट स्पार्क ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे.

या बाईकमध्ये 1043cc, इन-लाईन, 4-सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 120hp पॉवर आणि 102Nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये काही कॉस्मेटिक बदलही करण्यात आले आहेत. नव्या बाईकचा फ्रंट लूक आधीपेक्षा जास्त तीक्ष्ण आहे. यात एलईडी हेडलाईट, अडजस्टेबल विंडस्क्रीन आणि एलसीडी सेमी-डिजिटल कंसोल दिलं आहे.

नव्या कावासाकी वर्सेस 1000 मध्ये कावासाकी ट्रॅक्शन कंट्रोल (KTRC), क्रूज कंट्रोल, कावासाकी कॉर्निंग मॅनेजेमेंट फंक्शन (KCMF) आणि कावासाकी इंटेलिजंट एबीएस यांसारखे सेफ्टी फीचर्स आहेत. बाईकमध्ये दोन पॉवर मोड देण्यात आले आहेत. याच्या फ्रंट आणि रिअर सस्पेशनही अपडेट केले आहेत. बाईकच्या दोन्ही विल्ज 17-इंचाची आहे. बाईकच्या सीटची उंची 790mm आहे. यात 21 लिटरचा फ्यूट टँक देण्यात आला आहे.

कावासाकीच्या नव्या अॅडव्हेंचर-टूअरर बाईकची बुकिंग मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच सुरु झाली आहे. त्याची डिलिव्हरी मार्चपासून सुरु होणार आहे. तर आता जे बाईक बुक करतील त्यांना डिलिव्हरीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.  कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर ही बाईक बुक करता येऊ शकते. Ducati Multistrada 950 बाईकला नवी 2019 कावासाकी वर्सेस 1000 टक्कर देईल, अशी चर्चा बाजारात आहे.