बीएमडब्ल्यूने सध्या डिझेलवर चालणारी तीन एक्स 5 मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत सादर केली आहेत. पेट्रोलच्या चौथ्या मॉडेलची विक्री 2019 च्या अखेरीस सुरु होईल, असं कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं. सध्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मॉडेल्सच्या एक्स-शोरुम किमती या 73 ते 83 लाखांच्या घरात आहेत.
बीएमडब्ल्यू एक्स 5 ड्राईव्ह 30 डी 'स्पोर्ट' - 72 लाख 90 हजार
बीएमडब्ल्यू एक्स 5 ड्राईव्ह 30 डी 'एक्स लाईन' - 82 लाख 40 हजार
बीएमडब्ल्यू एक्स 5 ड्राईव्ह 40 आय 'एम स्पोर्ट' - 82 लाख 40 हजार
195 किलोवॅटचं शक्तिशाली बीएस 6 श्रेणीतलं इंजिन 265 हॉर्सपॉवरची ताकद या गाडीला उपलब्ध करुन देतं. एसएव्ही (स्पोर्ट्स एक्टिव्हीटी व्हेईकल) श्रेणीतील ही कार आपल्या 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे ताशी 0 ते 100 किमी. चा वेग अवघ्या सहा सेकंदात गाठू शकते. बीएमडब्ल्यूची एक्स ड्राईव्ह टेक्नॉलॉजी ड्रायव्हिंग कंडिशननुसार गाडीत ऑटोमेटिक बदल करुन घेते.
1999 मध्ये पहिली एक्स 5 बाजारात आल्यापासून कंपनीचं हे आजवरचं सर्वात यशस्वी मॉडेल ठरलं आहे. बीएमडब्ल्यूने जगभरात दोन कोटींपेक्षा अधिक एक्स 5 ची विक्री केलेली आहे. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेली ही कार बीएमडब्ल्यूच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवणार यात शंकाच नाही.