मुंबई : जर्मनीत आयोजित फ्रँकफर्ट मोटर शो-2017मध्ये सुझुकीच्या स्विफ्ट स्पोर्ट कारचा फर्स्ट लूक पाहायला मिळाला. ही कार रेग्युलर स्विफ्टचं हाय परफॉर्मेंस व्हर्जन आहे.



ही कार मजबूत पण कमी वजनाच्या हिअरटेक प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. रेग्युलर स्विफ्ट, बलेनो, डिझायर आमि इग्निस या कार देखील अशाच तयार करण्यात आल्या आहेत. नव्या स्विफ्ट स्पोर्ट कारचं वजन 970 किलो आहे. म्हणजेच रेग्युलर स्विफ्टपेक्षा हिच वजन तुलनेनं 80 किलोग्राम कमी आहे.



या नव्या कारमध्ये नव्या ग्रिल, कार्बन-फायबर फिनिशिंग देण्यात आली आहे. यामध्ये नवं बंपर, फ्रंट लिप स्पॉयलर, साइड स्कर्ट आणि रिअर डिफॉगर यासारखे फीचर देण्यात आले आहेत.

या कारच्या केबिनला देखील स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक ठिकाणी लाल रंगाचे हायलाटर आहेत. यामध्ये सेमी बकेट सीट देण्यात आल्या आहेत. तसेच या कारमध्ये फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हीलही देण्यात आलं आहे. हे स्टिअरिंग मारुती सुझुकी डिझायरमध्येही देण्यात आलं आहे.



या कारमध्ये 1.4 लीटर बूस्टरजेट पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. याची पॉवर 140 पीएस आणि टॉर्क 230 एनएम आहे. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.



भारतात आतापर्यंत एकही स्विफ्ट स्पोर्ट कार लाँच करण्यात आलेली नाही. त्यामुले ही कार भारतात कधी लाँच करण्यात येईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

बातमी सौजन्य : cardekho.com