मुंबई:  अनिल अंबानी यांची आरकॉम म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन कंपनी वायरलेस बिजनेस सेवा बंद करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या जवळपास बाराशे कर्मचाऱ्यांचं भवितव्य अंधारात आहे.


'30 नोव्हेंबरपर्यंतच तुम्ही कंपनीचे कर्मचारी आहात' अशी माहिती आरकॉमने आपल्या कर्मचा-यांना दिली असल्याचं वृत्त इकोनॉमिक टाइम्सनं दिलं आहे.

मुकेश अंबानींच्या जिओद्वारे मोफत कॉलिंग आणि स्वस्त इंटरनेटचा आरकॉमच्या व्यवहारावर परिणाम झाल्याचं कंपनीने म्हटलंय. आजपासून तीस दिवसांत वायरलेस बिझनेस बंद होईल , कोणत्याही परिस्थितीत आपण 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस हा बिझनेस सुरू ठेऊ शकत नाही, असं आरकॉमचे सीईओ आणि कार्यकारी निदेशक गुरदीप सिंह यांनी म्हटलं आहे.