Tanaji Sawant Son Rushiraj Sawant पुणे: माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषीराज सावंत (Rushiraj Sawant) यांचं काल (10 फेब्रुवारी) अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र काहीवेळेनंतर सह पुणे आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषीराज सावंत यांचं अपहरण झालं नसून मित्रांसोबत तो बँकॉकला निघला होता, अशी अपडेट समोर आली.
ऋषिराज सावंत बेपत्ता नाही, तो मित्रांसोबत आहे. पण तो नेमकं कुठे आहे याची माहिती नव्हती. तो चार्टर फ्लाईटने बाहेर गेला असल्याची माहिती ड्रायव्हरने दिली असंही तानाजी सावंत यांनी सांगितलं. त्यानंतर तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. त्यावेळी तानाजी सावंत हे पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ऋषिराज सावंत याचे अपहरण झाले नसून तो मित्रांसोबत बाहेर गेल्याची माहिती त्यांनी दिली.
ऋषीराज सावंतसोबत कोण कोण खाजगी विमानानं पुण्याहून बँकॉकसाठी निघालेलं?
ऋषीराज सावंतसोबत कोण कोण खाजगी विमानानं पुण्याहून बँकॉकसाठी निघालेलं याची माहिती समोर आली आहे. ऋषीराज सावंतसोबत प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर हे दोन मित्र खाजगी विमानात होते.

नेमकं प्रकरण काय?
ऋषीराज सावंत हा त्याच्या दोन मित्रांसोबत बँकोकला निघाला होता. एका खाजगी विमानाने संध्याकाळी साडेचार वाजता बँकॉकच्या दिशेने ठेवलं प्रस्थान केलं होतं. एका खाजगी कंपनीचे विमान भाड्याने घेऊन बँकॉकचे बुकिंग केलं होतं. एका खाजगी गाडीने पुणे विमानतळ गाठत तिथून बँकॉकला जाण्याचा प्लॅन केला होता. मात्र ड्रायव्हरने यासंदर्भातील सर्व माहिती त्याने ऋषिराज यांच्या घरच्यांना कळवली. त्यानंतर ऋषीराज सावंतच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अपहरण केल्याचा पोलिस कंट्रोल रुमला फोन आला. त्यानंतर सामंतांच्या संस्थेच्या संबंधीत व्यक्तीने सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. मात्र काही तासांनंतर तानाजी सावंत पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आणि पोलिसांसोबत चर्चा केली. त्यानंतर सह पुणे आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषीराज सावंत यांचं अपहरण झालं नसून मित्रांसोबत तो बँकॉकला निघला होता, अशी माहिती दिली.