नागपूरः उपराजधानीत 'स्वाईन फ्लू'चा विळखा घट्ट होत असून 30 जून पर्यंत फक्त 5 रुग्णांची नोंद मनपाकडे होती. मात्र आता सध्या 38 रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात भरती झाल्याची माहिती आहे. यापैकी काहींनी उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. तर मनपाच्या अॅक्टिव्ह सर्व्हेअंतर्गतही 6 नवीन 'स्वाईन फ्लू' बाधित आढळून आले आहेत.

महिन्याभरात बाधितांची रुग्णसंख्या छपाट्याने वाढत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. हा विषाणू झपाट्याने पसरत असल्याचे बघत वैद्यकीय क्षेत्रातही चिंता व्यक्त होत आहे. तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

महानगरपालिकेकडून सर्व्हेक्षण

'स्वाईन फ्लू'ची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागपूर महानगरपालिका प्रशासनही सज्ज झाला आहे. अॅक्टिव सर्व्हेद्वारा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. महिन्याभरातील करण्यात आलेल्या सर्वेक्षणामुळे आतापर्यंत 6 जणांचे अहवाल सकारात्मक आढळून आले आहे.

'स्वाईन फ्लू'ची लक्षणे

ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, उलटया व जुलाब हि सर्वसाधारण 'स्वाईन फ्लू'ची लक्षणे आहेत. गर्भवती स्त्रीया, उच्चरक्तदाब व मधूमेही रुग्ण, जेष्ठ नागरीक व लहान मुले तसेच, प्रतीकार शक्ती कमी असणारे व्यक्ती यांचे मध्ये हा आजार गंभीर स्वरुप धारण करु शकतो. त्यामुळे रुग्णाला धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, अशी गंभीर लक्षण आढळल्यास तातडीने व वैद्यकिय सल्ला घेणे आवश्यक आहे.

हे करा                            

  • हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत.
  • गर्दीमध्ये जाणे टाळा.
  • 'स्वाईन फ्लू' रुग्णापासून किमान 6 फूट दूर रहा.
  • खोकलतांना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा.
  • भरपूर पाणी प्यावे.
  • पुरेशी झोप घ्यावी.
  • पौष्टीक आहार घ्या. 

हे करु नका

  • हस्तांदोलन अथवा आलिंगन
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे

Agniveer Recruitment 2022 : नोंदणीसाठी शेवटचा दिवस, सैन्यदलाच्या सोबतीला जिल्हा प्रशासनही सज्ज