Swati Sachdeva Video: युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाने 'इंडियाज गॉट लेटेंट' मध्ये केलेल्या एक वादग्रस्त वक्तव्यानंतर एकच संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर युट्यूबर समन रैनावरही अश्लीलता पसरवत असल्याच्या आरोपावरुन नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्यात अजून एका महिला स्टँड-अप कॉमेडियनची भर पडली आहे. स्टँड-अप कॉमेडियन स्वाती सचदेवाचा (Swati Sachdeva Video) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्वाती सचदेवाने व्हायब्रेटरचा उल्लेख केला असून त्या विनोदाचा संबंध तिच्या आईशी तिने जोडला आहे. त्यामुळे कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता पसरवल्याचा आरोप स्वाती सचदेवावर करण्यात येत आहे.
स्वाती सचदेवा नेमकं काय म्हणाली? (What exactly did Swati Sachdeva say, video)
माझी आई कूल बनण्याचा प्रयत्न करतेय, पण तिच्याकडून ते घडत नाहीये. या विधानाबद्दल एक प्रसंग सांगताना स्वाती सचदेवा म्हणाली की, अलिकडेच तिच्यासोबत एक घटना घडली. माझ्या आईला माझे व्हायब्रेटर सापडले. यानंतर स्वाती सचदेवा आणि तिच्या आई यांच्यात जे काही संभाषण झाले, ते तिने सांगितले आहे. दरम्यान, व्हिडीओ समोर आल्यापासून, लोक सोशल मीडियावर स्वाती सचदेवाला ट्रोल करत आहेत.
कोण आहे स्वीती सचदेवा?
स्वाती सचदेवा ही एक स्टँड-अप कॉमेडियन आहे. याशिवाय, स्वाती सचदेवा एक लेखिका आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर देखील आहे. अलिकडेच, LGBTQ वरील स्वाती सचदेवाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिने ती बायसेक्शुअल असल्याचे उघड केले आहे. स्वाती सचदेवा ही दिल्लीची रहिवासी आहे, तिचा जन्म 1992 मध्ये पंजाबमध्ये झाला. स्वाती सचदेवाच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तिने अॅमिटी विद्यापीठातून जाहिरात आणि मार्केटिंगचे शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर स्वातीने मार्केटिंगमध्येही काम केले. स्वाती सचदेवा तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एक स्वतंत्र लेखिका होती. फ्रीलान्स कंटेंट लिहिताना, त्याने नंतर स्टँड-अप कॉमेडी सुरू केली. यानंतर, त्याने नेटफ्लिक्ससाठी फ्रीलान्स कंटेंट लिहिण्यास सुरुवात केली आणि विनोदी कलाकार म्हणूनही करिअर केले.