Crime News: बंगळुरुतील एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कामाला असणाऱ्या राकेश खेडेकर (Rakesh Khedekar) याने त्याची पत्नी गौरी सांबरेकर हिची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. राकेश खेडेकर आणि गौरी सांबरेकर (Gauri Sambarekar) हे दोघेही मुंबईत राहणारे होते. दोन वर्षांपूर्वी राकेश आणि गौरीचे लग्न झाले होते. याचदरम्यान आता एक नवीन माहिती समोर आली आहे. आरोपी राकेश खेडेकरने दिलेल्या जबाबानंतर पोलिसही हादरले.
राकेश आणि गौरी दोन महिन्यांआधीच मुंबईहून बंगळुरुला शिफ्ट झाले होते. मात्र यावरुन दोघांमध्ये वारंवार वाद सुरु होते. राकेश वर्क फ्रॉम होम करत होता, तर त्याची पत्नी गोरी जॉबच्या शोधात होती. 26 मार्च 2025 च्या रात्री गौरीने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. यानंतर राकेश आणि गौरीमध्ये पु्न्हा वाद झाला. यावेळी गौरीने चाकू दाखवून राकेशला मारण्याची भीती दाखवली. गौरीचं हे कृत्य पाहून राकेश संतापला आणि तोच चाकू घेत तिच्या मानेवर फिरवून हत्या केली. हत्या केल्यानंतर राकेश रात्रभर गौरीच्या मृतदेहाशी बोलत बसला होता. ऐ गौरी, माझ्याशी का भांडलीस?, तुला बंगळुरुमध्ये आल्यावर येवढा राग का आला होता?, असं राकेश मृतदेहाशी बोलत होता. राकेशने सदर माहिती पोलिसांच्या जबाबातही दिली आहे.
सकाळ होताच मृतदेहाचे तुकडे केले अन् सुटकेसमध्ये भरले-
हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीच्या मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले. याची माहिती त्यांनी जोगेश्वरी येथे राहत असलेल्या आपल्या कुटुंबातील लोकांना देखील दिली होती. त्यानंतर तो स्वतःच्या खाजगी वाहनाने बंगळुरू वरून जोगेश्वरीला येत होता. येत असताना त्याने रस्त्यात झुरळ मारण्याचे औषध व फीनेल पिले, त्यामुळे तो शिरवळच्या आसपास बेशुद्ध झाला. स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तपासणी केल्या असता हा आरोपी असल्याचे पोलिसांना लक्षात आले. दरम्यान, गौरीने रात्रीच्या जेवणासाठी भात आणि कुर्मा बनवला होता. पण दोघांमध्ये वाद झाल्याने दोघंही जेवले नव्हते. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा कुकरमध्ये भात तसाच होता.
नेमकं काय घडलं?
राकेश खेडेकर आणि गौरी सांबेकर यांचे 2 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. गौरी ही राकेशच्या आत्याची मुलगी आहे. दोन महिन्यापूर्वी दोघेही बंगळुरू येथे शिफ्ट झाले होते. दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यानंतर काही दिवसापूर्वी बंगळुरु पोलिसांनी दोघांची समजूत घातली होती. मात्र तीन दिवसांपूर्वी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाले. हा वाद शीगेला पोचून राकेश खेडेकरने पत्नी गौरी वर चाकूने वार करत हत्या केली. राकेश खेडेकर एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर काम करत होता. राकेश वर्क फ्रॉम होम करत होता, तर त्याची पत्नी गोरी जॉबच्या शोधात होती. 26 मार्च 2025 च्या रात्री गौरीने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. यानंतर राकेश आणि गौरीमध्ये पु्न्हा वाद झाला. फ्लॅटचे डिपॉझिट आताच आपण भरले आहेत. ते परत मिळणार नाही. आधीच खूप खर्च झाला आहे, असं राकेशने गौरीला समजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी गौरीने चाकू दाखवून राकेशला मारण्याची भीती दाखवली. तसेच घरातील काही भांडीही गौरीने फेकली. याचाच मनात राग धरुन राकेशने गौरीची हत्या केली.