Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील विविध कारणांनी निलंबित (Suspended) सात शिक्षकांना संग्रामपूर (Sangrampur) तालुक्यातील विविध शाळा हे मुख्यालय निलंबित काळासाठी देण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे IAS मुख्याधिकाऱ्यांनी हे निलंबन आदेश काढून निलंबित शिक्षकांना मुख्यालय राहणे बंधनकारक व मुख्यालय न सोडण्याचे आदेश दिलेले असतानाही, यातील एकही शिक्षक वर्षभर मुख्यालयी न राहता त्यांचे वर्षभराचे वेतन संग्रामपूर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे जनतेच्या पैशाची स्वयंघोषित नियम बनवून कशी उधळपट्टी होत आहे, हे समोर आल आहे.
Buldhana News : बुलढाण्यात गटशिक्षण अधिकाऱ्याचे स्वयंघोषित नियम, जनतेच्या पैशांची सर्रास उधळपट्टी
दरम्यान, निलंबित सात शिक्षकांपैकी रेखा मानकर या गंभीर गुन्ह्यात आरोपी असतानाही त्यांना संग्रामपूर तालुक्यातील निमखेड प्राथमिक शाळा हे मुख्यालय देण्यात आलेला आहे. मात्र गेल्या डिसेंबर महिन्यापासून त्या एकही दिवस मुख्यालय आलेल्या नसल्याची नोंद "एबीपी माझा" च्या कॅमेरात कैद झाली आहे. याबाबत संग्रामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिरी दीपक देविदास ताले यांना विचारणा केली असता त्यांनी स्वयंघोषित नियमच माध्यमांना सांगितले. या पंचायत समिती अंतर्गत सात निलंबित शिक्षक मुख्यालय हजर न राहता त्यांचे वर्षभराचे पगार काढल्याचही अजबच उत्तर गटशिक्षणाधिकारी ताले यांनी दिलं.
Education Officer : म्हणे, निलंबित शिक्षकांना मुख्यालय हजर राहणे हे बंधनकारक नाही
तर निलंबित शिक्षकांना मुख्यालय हजर राहणे हे बंधनकारक नसून त्यांना पगार दिला जात नसून उदरनिर्वाह भत्ता दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, पोक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेचा गेल्या वर्षभराचा पगार मुख्यालयात हजर न राहता काढल्याने आता गटशिक्षणाधिकारी अडचणीत आले आहे. कारण त्यांनी जनतेच्या पैशाचा अपव्य केल्याचं म्हटलं जात आहे.
राजकारण्यांच्या श्रेय वादात भंडाऱ्यात प्रशासकीय इमारतीची "बत्तीगुल"
भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या मतदारसंघातील लाखांदूर इथं कोट्यवधी रुपये खर्चून भव्य अशी तहसील कार्यालयाची प्रशासकीय इमारत उभी केली. मागील सात सुसज्ज अशी ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. तर, आमदार काँग्रेस नेते नाना पटोले आहेत. नाना पटोले यांनी या इमारतीच्या लोकार्पणासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा वेळ मागितली. नाना पटोले हे काँग्रेसचे नेते असले तरी, सत्ताधारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नानांची मैत्री सर्वश्रुत आहे.
असं असलं तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाखांदूर तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनासाठी वेळ नं देणं म्हणजे...कुठं अंतर्गत राजकारणात इमारतीचं लोकार्पण रखडलं की काय? अशी चर्चा आता रंगली आहे. इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असतानाच इमारतीचा वीजपुरवठा महावितरणनं कापला आहे. मागील सहा महिन्यांपासून आलेलं केवळ 68 हजारांच्या वीज बिल थकीत असल्यानं या इमारतीचा वीज पुरवठा कापल्यानं राजकारण्यांच्या श्रेय वादात प्रशासकीय इमारतीची बत्तीगुल झाल्याची भावना आता व्यक्त होत आहे.
आणखी वाचा