Suresh Dhas On Prajakta Mali: सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना लक्ष्य करणारे भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी नवीन आणि गंभीर आरोप केले. सुरेश धस यांनी बीडमध्ये होत असलेल्या सिने अभिनेत्रींच्या कार्यक्रमांचा दाखला देत इव्हेंट पॉलिटिक्स सुरु असल्याचं म्हटलंय. यावेळी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा उल्लेख देखील सुरेश धस यांनी केला होता. याच्या विरोधात आज प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 


सुरेश धस नेमकं काय म्हणाले?


सुरेश धस यांनी काल (27 डिसेंबर) घेतलेल्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होत की, आम्ही बघत असतो रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी, सपना चौधरी यांचे जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे. धनुभाऊ आपले विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचे आहे. आमचा लेकरू मेले त्याला न्याय द्यायचा. तुला कोणी घेरले आहे..? हा काही राजकीय विषय नाही, असं विधान सुरेश धस यांनी केलं होतं. सुरेश धस यांच्या या विधानानंतर प्राजक्ता माळी याविरोधात महिला आयोगात तक्रार करणार असल्याचं बोललं जात आहे.


धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ होणार?


महादेव अॅप प्रकरणाचं बीड कनेक्शन असल्याचा मोठा दावा सुरेश धस यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील गायरान जमिनी गाळे बांधण्यासाठी हडपल्याचा आरोपही धस यांनी केला. तसेच बीडमध्ये होत असलेल्या सिने अभिनेत्रींच्या कार्यक्रमांचा दखल देत त्यांनी इव्हेंट पॉलिटिक्स सुरु असल्याचं म्हटलंय. सर्व विषयांवर बोलताना धस यांनी मात्र संपूर्ण प्रकरणामागे आकांचा हात असल्याचं आवर्जून सांगितलंय. त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ होणार का हे पाहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.


वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी-


सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये जिथे सीआयडीचं पथक सकाळपासून काम करत आहे. त्यांनी दोन ते अडीच तास मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलंय. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होते, त्यानंतर  त्यासंदर्भातील चौकशीचा भाग असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 




संबंधित बातमी:


संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, मला फोन आला; अंजली दमानियांचा धक्कादायक दावा