Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. या हाणामारीमध्ये एका डॉक्टरांच्या डोक्याला देखील रॉड लागला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यातून या प्रकरणावर संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज (दि.12) घाटी रुग्णालयाला भेट देऊन जखमी डॉक्टर महिलेची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस ,हसन मुश्रीफ यांच्या भेटीसाठी वेळ मागणार
सुप्रिया सुळे म्हणाल्या, घाटी रुग्णालयात घडलेली घटना चुकीची आहे. याबाबत सर्व माहिती घेतली. शहरात गुन्हेगारी वाढली आहे. मी उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री हसन मुश्रीम यांच्या भेटीची वेळ मागणार आहे. त्यांनी याबाबत उत्तर दिले पाहिजे. डॉक्टरांवर झालेला हल्ला निंदनीय आहे. गृहमंत्रालयाच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
सरकार फक्त कार्यक्रमात व्यस्त : सुप्रिया सुळे
महिला आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेबद्दल गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणार आहे. हे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे. सरकार फक्त कार्यक्रमात व्यस्त आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाशिकला होते. मात्र कांदा प्रश्नाबाबत कोठेही बोलताना दिसले नाहीत. पक्ष फोडण्यात, घर फोडण्यात हे व्यस्त आहे. यांना सुरक्षिततेचे काही घेणेदेणे नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
अशा घटना म्हणजे महाराष्ट्राचे दुर्दैव
पुण्यात सध्या कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. या गँगमुळे लोक दहशतीत आहेत. फडणवीस यांना प्रेसमध्ये बोलले की, आम्ही ड्रग्सच्या बाबतीत राजकारण आणणार नाही, पण त्यांनी काहीच केलं नाही. फडणवीस म्हणाले होते ड्रग्स थांबवू पण त्यांनी काहीच केलं नाही. ड्रग्स प्रकरणात भाजपचा हात असू शकतो, असा दावाही सुळे यांनी केला. ड्रग्सचा प्रकार थांबवण्यासाठी आवाहन केलं तर आम्ही सर्व फडणवीस यांना पाठिंबा देऊ, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.
आमच्याकडे लोकशाही आहे ; सुप्रिया सुळे
'अतिथी देवो भव' पाहुण्यांचे स्वागत करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र, महाराष्ट्रात सर्व प्रश्न गंभीर आहे त्यांनी त्यावर पण बोलावं. आमच्याकडे लोकशाही आहे. अजित दादा काहीही बोलतील बोलू द्या. आमचं सरकार महिलांना सुरक्षितता पुरवते असे म्हणून मोदींनी फडणवीस यांचे कान टोचलेत. कारण महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही, असा टोलाही सुळे यांनी लगावला. महाराष्ट्रातील गृह खात्याला गुन्हेगारी थांबविणे शक्य नसेल तर मी अमित शहांना यंत्रणा पाठवण्यास सांगेल, असेही सुळे म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या